Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थकीत एफआरपीवरुन राजू शेट्टींचा अल्टीमेटम; म्हणाले, येत्या 8 दिवसात…

राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची ७ हजार कोटी रूपयाचे एफआरपी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 27, 2025 | 02:38 PM
'शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका'; कृषिमंत्र्यांबाबत राजू शेट्टी आक्रमक

'शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केली, त्यांना मंत्रिमंडळात ठेऊ नका'; कृषिमंत्र्यांबाबत राजू शेट्टी आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची २३४९ कोटी रूपयाची एफआरपी थकीत असल्याची चुकीची आकडेवारी असून, राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास ७ हजार कोटी रूपयाचे एफआरपी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून तातडीने उसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांच्याकडे केली.

उस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत मागील आठवड्यात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील थकीत एफआरपीबाबत शेट्टी यांनी मंगळवारी पुणे येथे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी थकीत एफआरपी बरोबरच काटामारी, रिकव्हरी चोरी, वजनकाटे ॲानलाइन करणे, तोडणी वाहतुकीचा खर्च अंतरावर निर्देशात करण्यात यावा, थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावे, राज्यातील साखर कारखान्यांचे शासकीय लेखा परिक्षकाकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, यासह विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.

राज्यातील काही मोजके राज्यकर्तेच साखर उद्योगात वर्चस्व निर्माण करून साखर उद्योगात एकाधिकारशाही निर्माण करत आहेत, असा आरोप करून शेट्टी म्हणाले, मुठभर कारखानदार साखर उद्योगाची सुत्रे स्वत:च्या हातात ठेवून चुकीचे कायदे करून उस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. वास्तविक पाहता साखरेसह उपपदार्थांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देणे सहज शक्य आहे. मात्र साखर कारखानदार प्रक्रिया खर्च वाढल्याचे कारण सांगत दोन किंवा तीन टप्यात एफआरपी देण्याचा घाट घालत आहेत.

कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम पाहता उसाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अंतराची अट टाकून नवीन साखर कारखान्यांना शासनाकडून मान्यता देणे बंद आहे. मात्र दुसरीकडे तीन हजार व पाच हजार गाळप असणारे कारखान्यांनी सध्या १८ ते २० हजार टनांनी गाळप क्षमता वाढवून गाळप सुरू केले आहेत. यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगामाचे दिवस कमी झाले असून, याचा अनिष्ठ परिणाम कारखान्यांच्या अर्थकारणावर झाला आहे, असे शेट्टी यांनी नमूद केले.

कारवाई न केल्यास धडक मोर्चा काढणार

येत्या आठ दिवसात साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ७ हजार कोटी रूपये १५ टक्के व्याजासह देण्यासंदर्भात साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई न केल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Raju shetty has given an ultimatum to the sugar commissioner on frp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • Raju Shetti
  • Sugarcane

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.