
राजापूर : राज्यभरासह कोकण किनारपट्टीतही परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं आहे. या पावसामुळे सर्वात जास्त फटका बसला तो बळीराजाला. कोकण विभागात मुसळधार पावसाने भातशेती आणि आंबा बागायतीवर मोठं संकट आलं आल्याचं दिसत आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती आंवा चागायतदारांकडून वर्तविली जात आहे.
परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहील्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यावर्षीच्या आंबा हंगामाला आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे. अवेळी लागणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील भात पिकाचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच आता आंबा पीकही धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून लहरी हवामानामुळे तसेच पावसामुळे हे हापूस आंब्याचे पीक हे बेभरवशी पीक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
अनेक समस्यांशी सामना
लहरी हवामानामुळे हापूस पिकाला विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पीक कमी येणे, पिकावर किडीचा प्रादुर्भाव होणे, फळांवर डाग पडणे, पीक उशिराने येणे, मोहर जळून जाणे तसेच फळांचा आकार लहान होणे यांसारख्या अनेक समस्यांना सातत्याने आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.
बागायतदारांसह शेतकरी हतबल
हापुस पिकावरील या संकटाबाबत कृषी विद्यापीठांकडूनही आवश्यक त प्रभावी उपाय योजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे काय करावे यावाचत आंचा बागायतदारही हतबल झालेले आहेत. त्यातच आता पावसाने नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखे नंतरही आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. गेल्या तीन ४ दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्ह्यातील उभी पिके जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे तर आता हापूस पिकालाही अवेळी लागणाऱ्या पावसाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
अवकाळीने घातला चांगलाच धुमाकूळ
यावर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि त्यापूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरी, आंब्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. काही आंबा कलमांना पालवी आली आहे. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आआंब्याच्या देवू घातलेल्या मोहोरावर होणार आहे. त्यातून, यावर्षी आग्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशीरा देण्याची शक्यता आहे. असं आंबा बागायतदार, विजय शिंदे यांनी सांगितलं आहे.