Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 18, 2025 | 04:00 PM
Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
Follow Us
Close
Follow Us:
  • मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका
  • मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
  • रक्ताळलेल्या अवस्थेतील मगर पशुवैद्यकीय केंद्रात दाखल

 

पाली : रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन देखील विस्तळीत झालं असून बाजारपेठ आणि रस्ते देखील जलमय होताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली आहे.

स्थानिक नागरिकानी  ही मगर मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारील साठलेल्या पाण्याच्या डबक्यात दिसली होती . त्यानंतर स्थानिक नागरिकाने याबाबत वन्यजीव रक्षक शंतनू कुवेसकर यांना माहिती दिली. शंतनू कुवेसकर यांनी वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य यांना लागलीच ही माहिती दिली. वनविभाग व वन्यजीव रक्षक यांनी मगरीला रात्री 10  वाजता सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं आहे. या मगरीची लांबी साधारण चार फूट होती. मगरीच्या अंगावरून अज्ञात वाहन जाऊन मगरीला दुखापत झाली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते. तसेच पाठीमागचे दोन्ही पाय अधू झाले होते.

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र तिला उपचाराची गरज होती. त्यामुळे मुख्यवनरक्षक प्रवीण एन. आर. यांनी या मगरीला पुढील उपचारासाठी पुणे येथे रेस्क्यू संस्थेकडे नेण्याची परवानगी दिली. त्यानुसार सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य पहाटे चार वाजता मगरीला घेऊन पुण्याला पोहोचले. सध्या रेस्क्यू संस्थेमध्ये मगरीवर उपचार सुरु आहेत.सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे येथील मगरी बाहेर येत आहेत. अशा प्रकारे मानवी वस्तीमध्ये कोणालाही मगर दिसल्यास तिला जवळून निरखून पाहण्यासाठी जाऊ नये. तत्काळ वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांना संपर्क करावा असे आवाहन सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सागर दहिंबेकर यांनी केले आहे.

Kokan Rain Alert: २४ तासांमध्ये कोकणाला बसणार फटका; अतिवृष्टी, उंच लाटा अन्…; IMD च्या इशाऱ्याने वाढली चिंता

Web Title: Ratnagiri news heavy rains hit wildlife crocodile found injured on mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai Goa Express Way
  • Raigad News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार
2

Matheran News : दसऱ्यानिमित्ताने धनगर समाजाकडून माथेरान शहरात शोभायात्रा; पारंपरिक नृत्याचा अविष्कार

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
3

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
4

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.