Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळत आहे्. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी दौरा केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 08, 2025 | 12:53 PM
Ratnagiri News : परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा पाहणी दौरा
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजेंनी चिपळूण तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट दिली. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांचे परशुराम घाटाजवळ आगमन झाले. महायुतीच्या वतीने आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयद्रथ खताते, भाजपचे नेते रामदास राणे, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी, मयूर खेतले, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम, उदय उतारी, भाजपचे विनोद भूरण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एका विद्यार्थ्यावर सळी कोसळल्याने झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निहार कोवळे यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे केली. महामार्गावरील अडचणींबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर निवेदने सादर केली.

यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परशुराम घाटाची प्रत्यक्ष पाहणी न करता ‘घाटाला वळसा’ घालून थेट चिपळूण शहरात आगमन केले. येथे शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत सत्कार केला. या वेळी उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, राणी महाडिक, धीरज नलावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे मंत्री पाग पॉवर हाऊस येथे पोहोचले. येथे झालेल्या चर्चेत माजी आमदार विनय नातू, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उमेश सकपाळ यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. या वेळी उमेश सकपाळ यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांची माहिती देताना संदेश भालेकर यांचा अलीकडील अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. विजेची अनुपलब्धता, पावसात पाणी साचणे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे शशिकांत मोदी यांनी निदर्शनास आणले.

या ठिकाणी महामार्ग विभागाचे अधिकारी शेलार यांनी स्थानिकांना कल्पना न देता दौरा केल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी संताप व्यक्त केला. “असे कामचुकारू अधिकारी जनतेच्या जिवाशी खेळत असून, त्यांनी आपली कामाची पद्धत बदलावी,” असा इशाराही त्यांनी दिला. “माझ्या गावातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण असे अधिकारी असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होईल आणि शंभर टक्के प्रगती होईल, अशी नवी डेडलाईनही त्यांनी जाहीर केली.मात्र, परशुराम घाटाची पाहणी न केल्यामुळे स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अंधारात दौरा पार पाडल्यामुळे घाटातील प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन न झाल्याची टीका करण्यात येत आहे.

Web Title: Ratnagiri news new measures proposed for parshuram ghat inspection visit of shivendrasinh raje

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai Goa Express Way
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.