Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

65 दिवसांपासून विवेक सांगळेचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद; अपील करूनही अभिनेत्याला मिळाला नाही प्रतिसाद

मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता विवेक सांगळेचे गेले अनेक दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाउंट बंद झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याने आता स्वतःच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सत्य सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 11:25 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 65 दिवसांपासून विवेक सांगळेचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद
  • विवेकने चाहत्यांसाठी सुरु केले नवे इन्स्टाग्राम अकाउंट
  • अपील करूनही मिळाला नाही प्रतिसाद
मराठी टेलिव्हिजन वरील अभिनेता विवेक सांगळे याचे व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट बंद होऊन तब्बल 65 दिवस उलटले आहेत. 3 जानेवारी 2026 रोजी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर अधिकृत अपील दाखल केले होते, मात्र इतका कालावधी उलटूनही अद्याप त्यावर कोणताही निर्णय किंवा त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या विवेक सांगळेने यापूर्वी ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेमुळे मोठी ओळख मिळाली आहे. आणि आता तो ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये दिसत आहे.

अनुराग डोभालला मोठा झटका! वडिलांनी संपत्तीपासून केले दूर, म्हणाले ‘माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही…’

अकाउंट अचानक बंद झाल्यानंतर अभिनेत्याने इन्स्टाग्रामला नियमित अपील प्रक्रिया केली आहे. त्याच्या मते, ज्या कंटेंटबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता त्यासंदर्भात संबंधित ब्रॉडकास्टरने नंतर लेखी स्पष्ट केले की ते केवळ ऑटोमेटेड कॉपीराइट मॅचेस होते आणि कोणतीही मॅन्युअल कॉपीराइट तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. हे स्पष्टीकरण अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम सपोर्ट सिस्टीमला पाठवत मॅन्युअल रिव्ह्यूचीही विनंती केली आहे.

 

नव्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विवेकने अकाउंट बंद झाल्यानंतर प्लॅटफॉर्मने सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. मेटाच्या मुंबईतील टीमसह अमेरिकेतील सपोर्ट चॅनेललाही ईमेल पाठवण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अकाउंट बंद होण्यापूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर 1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते आणि त्याच्या अनेक रील्सना लाखो ते कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते. एका व्हिडिओला तर 32 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते, असे अभिनेत्याने सांगितले आहे.

सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; 3-4 दिवसांत हॉस्पिटलमधून मिळणार डिस्चार्ज, चाहत्यांना मोठा दिलासा

आजच्या काळात कलाकारांसाठी इन्स्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवादाचे माध्यम नसून प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसेच व्यावसायिक संधींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असे इंडस्ट्रीतील काही निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी विवेक सांगळे याने नवे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले असून चाहत्यांना ते फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. जुने अकाउंट पुन्हा सुरू होईल या आशेने अभिनेता निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

Web Title: Marathi actor vivek sangle instagram account closed 65 days appeal pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
2

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
3

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
4

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.