Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबा निर्यातीवर युद्धाचा परिणाम होणार; यंदा दरात मोठी कपात होण्याची शक्यता

मुंबई एपीएमसीत 5 हजार ते 10 हजार रुपये पेटीचा दर आहे. 15 मार्चपासून हापूसची आवक सुरू होईल. निर्यात थांबल्याने कोकण हापूसची 20 ते 25 टक्के आवक आता मुंबई एपीएमसीत होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 11:42 AM
आंबा निर्यातीवर युद्धाचा परिणाम होणार; यंदा दरात मोठी कपात होण्याची शक्यता

आंबा निर्यातीवर युद्धाचा परिणाम होणार; यंदा दरात मोठी कपात होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

गुहागर : इराण–इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम शेतमालासह कोकण हापूस आंब्याच्या निर्यातीवर जाणवायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ३० ते ३५ टक्के हापूसची निर्यात होते. निर्यात कमी झाल्यास बाजारात आंब्याचा साठा वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती आहे. इराणने आयात, निर्यातीचे प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे आता युद्ध थांबणे हाच यावर पर्याय असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

रमजान महिन्यात द्राक्ष, पपई, खजूर यांसह केळी, खरबुजा यांसारख्या फळांना खूप मागणी असते. मात्र, युद्धामुळे ही फळे बाजारात उपलब्ध होत नसल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. कोकण हापूसची निर्यात थांबली तर त्याचा परिणाम थेट विक्रीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा वाशी येथील घाऊक बाजारात दाखल झाला आहे. मुंबई एपीएमसीत 5 हजार ते 10 हजार रुपये पेटीचा दर आहे. 15 मार्चपासून हापूसची आवक सुरू होईल. निर्यात थांबल्याने कोकण हापूसची 20 ते 25 टक्के आवक आता मुंबई एपीएमसीत होईल. यामुळे बाजारात हापूस स्वस्त दरात विकला गेला, तर कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यातच हापूसच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे.

हेदेखील वाचा : Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

दरवर्षी मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आखाती देशांमध्ये पाठवला जातो. मात्र, सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर पूर्ण बंदी आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर त्याचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. निर्यात कमी झाल्यास बाजारात आंब्यांचा साठा वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे दरांवरही परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, निर्यात कमी झाल्यास चांगल्या दर्जाचा हापूस आंबा स्थानिक बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने खवय्यांना यंदा उत्तम दर्जाचा आंबा चाखण्याची संधी मिळू शकते. जेएनपीए बंदरात मालाने भरलेले हजारो कंटेनर पडून आहेत. माल सडून जाण्याच्या भीतीने तोच माल आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात विकण्यासाठी आणला जात आहे. मात्र, आखाती देशात लाखो रुपयांना निर्यात होणारा माल आता कवडीमोल भावाने स्थानिक बाजारात विकला जात असल्याने याचा थेट फटका व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनाही बसत आहे.

हेदेखील वाचा : Latur Municipal Corporation : लातूर मनपात स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला; अधिकृत निवड आज होणार

Web Title: War will affect mango exports big price cut likely this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Mango Rate
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
1

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;
2

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
3

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?
4

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.