Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : “या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय”; प्रीपेड मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा

प्रीपेड मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी,अन्यथा योग्य तो बंदोबस्त केला जाईल,असा स्पष्ट इशाराच यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी महावितरणला दिला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 07, 2025 | 06:11 PM
Ratnagiri News : “या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय”; प्रीपेड मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : या सरकारचे करायचे काय,खाली डोकं,वरती पाय,जुलमी सरकार हाय-हाय,महावितरणचा निषेध असो,प्रीपेड मीटरच्या निर्णयाचा धिक्कार असो.,बंद करा , बंद करा,प्रीपेड मीटर बंद करा…..,आशा घोषणा देत महाविकास आघाडीने मंगळवारी खेर्डी गाव दणाणून सोडले.प्रीपेड मीटरची सक्ती ताबडतोब बंद करावी,अन्यथा योग्य तो बंदोबस्त केला जाईल,असा स्पष्ट इशाराच यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी महावितरणला दिला.

विजेचे जुने मीटर बदलून नवीन प्रीपेड मीटर बसवण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून त्याला विरोध देखील होत आहे.परंतु त्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कत प्रीपेड मीटर बसवत आहेत.त्यामुळे विजेचे बिल दुप्पट व तिप्पट येत असल्याने नागरिकांची मोठी ओरड होत आहे.त्याची खेर्डी आणि पेढे ज़िल्हा परिषद गटातील महाविकास आघाडी च्या सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेत जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती.त्याला खेर्डी आणि पेढे ज़िल्हा परिषद मधील महाविकास आघाडीने जोरदार प्रतिसाद दिला आणि मंगळवारी जनआक्रोश मोर्चा थेट खेर्डी येथील महावितरण कार्यालयावर धडकला.

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव या मोर्चात सहभागी झाले होते.तर शिवसेना उबाठा क्षेत्रप्रमुख बाळा कदम,तालुकाप्रमुख बळीराम गुजर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा,माजी जी.प अध्यक्ष विक्रांत जाधव,युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते,उबाठा शहराध्यक्ष सचिन कदम,उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये,विभाग प्रमुख विजय शिर्के, काँग्रेस चे उपतालुका अध्यक्ष सुबोध सावंतदेसाई,राष्ट्रवादी पवार गट उपतालुका सुनिल गुरव,विभाग प्रमुख राम डिगे बावा शिंदे,शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, बाबा सुर्वे, रोशन आंब्रे,नितीन शिगवण, युवासेना विभाग अधिकारी राहुल भोसले,युवतीसेना तालुका अधिकारी शिवानी खताते,पार्थ jaguthe, इगबल बेबल,मुसा चौगुले,मुराद चौगुले,संजय चांदे,सुधाकर दाते,यशवंत लाड,कमाल बंदरकर,काँग्रेस चे संजय जाधव,दीपक मोरे,विनय पिटले युसूफ बेबल,आदी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

मोर्चा खेर्डी महावितरण कार्यालया समोर येताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन देत प्रीपेड मीटरला तीव्र विरोध दर्शवला.यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवता कामा नये,तसेच जे प्रीपेड मीटर जबरदस्तीने लावण्यात आले आहेत ते तात्काळ काढण्यात यावेत,कोणत्याही ठिकाणी जबरदस्ती करून आणि बंद असलेल्या घरांना मीटर बसवले गेले तर महाविकास आघाडी ते सहन करणार नाही.असा स्पष्ट इशाराच यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्रातील सरकार हे खोटारडे सरकार आहे.पावसाळी अधिवेशनात प्रीपेड मीटरचा विषय येताच मी विरोध केला त्यावेळी प्रीपेड मीटर खाजगी घरांना व खाजगी अस्थापणेला बसवले जाणार नाही.तर फक्त सरकारी कार्यालयांना बसवले जातील,असे सरकारने सभागृहात सांगितले होते.परंतु नंतर शब्द फिरवला.प्रत्येक विषयात सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे.त्यामुळे या सरकारवर विश्वास राहिलेला नाही.जनतेने आता जागे राहिले पाहिजे.यापुढे प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास सहन करणार नाही.योग्य तो बंदोबस्त करू असा स्पष्ट इशारा आमदार जाधव यांनी यावेळी दिला.

राजकीय घडामोडींना वेग! तासगावात संजय पाटलांचा संवाद मेळावा; पुढील रणनीती ठरणार?

Web Title: Ratnagiri newsratnagiri news public outcry in chiplun against prepaid meters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Electricity Bill
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण
1

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण

Ratnagiri :  चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी
2

Ratnagiri : चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी

Ratnagiri News :  उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी बागायतदार प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
3

Ratnagiri News : उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी बागायतदार प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

Ratnagiri : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा आक्रोश, 2 महिन्यांपासून पेन्शन रखडली
4

Ratnagiri : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा आक्रोश, 2 महिन्यांपासून पेन्शन रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.