उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन; लवकरच सुरक्षा दलाचा देशातला मोठा प्रकल्प रत्नागिरीत येणार
रत्नागिरीत प्रदुषण विरहीत नवा प्रकल्प स्थानिकांना रोजगार मिळवूण देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी स्थानिक तरुणांन्या परदेशी प्रशिक्षणातसाठीची जबाबदारी शासनाकडून घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.
रत्नागिरी, जमीर खलफे – रत्नागिरीत नवीन प्रकल्प होत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नुकतं या प्रकल्पासाठीचे भूमीपुजन उदय सामंत यांच्या हस्ते झालं आहे. सुरक्षेसाठीचा देशातला सर्वात मोठा प्रकल्प रत्नागिरी येथे होणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांना मोठा रोजगार देखील मिळणार आहे. यासाठी येथील तरुणांना प्रक्षिणासाठी परदेशात पाठविण्याची जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल. 19 हजार 550 कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पासाठी रत्नागिरीतील 1 हजार500 युवकांना परदेशात प्रशिक्षण देवून, इथल्या प्रकल्पात रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर धीरुभाई अंबानी यांच्या डिफेन्स क्लस्टरमधून देशाच्या संरक्षणाचा प्रदूषणविरहीत प्रकल्प होणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून 38 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी अशा प्रकल्पांचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
एमआयडीसीच्या झाडगाव ब्लॉकमधील जागेवर कुदळ मारुन सेमिकंडक्टर प्रकल्पाचे आज उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर श्रध्दा साफल्य हॉलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमास व्हीआयटी सेमिकॉन्स पार्क प्रा. लि. चे संचालक ताजपूर संपथ कण्णन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उद्योजक दीपक गद्रे, प्रशांत पटवर्धन, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, सचिन राक्षे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सरपंच फरिदा काझी, तहसिलदार राजाराम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होते.
भूमीपुजनादरम्यान उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुलांनी शिकून परदेशात नोकरीसाठी जावं, असं आई-वडिलांचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न या प्रकल्पामध्येच पूर्ण करता येवू शकणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या थेट 2 हजार कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 500 रत्नागिरीतील असणार आहेत. त्यांना परदेशात आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी आणण्यासाठी अशा प्रकल्पांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिले पाहिजे.
उदय सामंत म्हणाले की, याबाबत अंबानींशी स्वत: चर्चा केल्याचे सांगितले आहे. डिफेन्स क्लस्टर्सचा दुसरा उद्योग रत्नागिरीत आणला आहे. हा प्रदूषण विरहीत प्रकल्प असून, देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे. तीन वर्षानंतर इथे तयार झालेली बंदूक सैनिकांच्या हातामध्ये असेल. अशा प्रकल्पांचे समर्थन आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे.अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
Web Title: Bhumi pujan by industries minister uday samant soon the countrys biggest project of security forces will come to ratnagiri