Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Ratnagiri: विसर्जनापूर्वी कुटुंबीयांनी श्रींची पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून पुढील वर्षीं सुख समृद्धीने पुन्हा आगमन व्हावे, अशी प्रार्थना केली शहरातील बाजारपुल, खंड बावशेवाडी नदी, बहादूरशेखनाक्याजवळील वाशिष्ठी नदी, पाग नदीकिनारी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 02:00 PM
गणेशोत्सव 2026

गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीत दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
  • चिपळूणात गणरायाला भावपूर्ण निरोप
  • गुलालाची उधळण; पारंपरिक आरती
रत्नागिरी: गणेशचतुर्थीच्या पावन पर्वावर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने आणि अलोट उत्साहात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मंतरलेले आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात तब्बल १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तीचे पूजन करून नागरिक उत्सवाचा आनंद लुटत आहेत. प्रत्येक घरातून धूप-दीपाचा सुगंध आणि आरत्यांचा गजर ऐकायला मिळत असून गणेशोत्सवाचा हा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे.

गुलालाची उधळण; पारंपरिक आरती

दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर भाविकांनी मंगळवारी विहिरी आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसिद्ध मांडवी, भाट्ये आणि पांढरा समुद्र या मुख्य किनाऱ्यांवर दीड दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि ‘मंगळमूर्ती मोरया’ या जयघोषाने संपूर्ण समुद्रकिनारे आणि परिसर दुमदुमून गेले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण व पारंपरिक पद्धतीची आरती करून भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला, स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून किना-यांवर सुरक्षेची आणि निविघ्न विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. बाप्पाला निरोप देताना भाविकांनी पुढील वर्षीच्या आगमनाची आस धरत निरोप घेतला. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत, उत्साहात संपन्न झाला.

गणेशोत्सवाच्या उत्साहात चिपळूण शहरासह तालुक्यात घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणरायाला मंगळवारी भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ‘च्या जयघोषाने शहरातील विविध भाग दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी संध्याकाळी भाविकांची लगबग सुरू झाली होती. घरगुती गणरायाच्या मूर्ती सजविलेल्या वाहनांमधून तसेच हातात घेऊन विसर्जनस्थळी नेण्यात आल्या.

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

विसर्जनापूर्वी कुटुंबीयांनी श्रींची पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून पुढील वर्षीं सुख समृद्धीने पुन्हा आगमन व्हावे, अशी प्रार्थना केली शहरातील बाजारपुल, खंड बावशेवाडी नदी, बहादूरशेखनाक्याजवळील वाशिष्ठी नदी, पाग नदीकिनारी मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणेशभक्तांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासन, नगरपरिषद, संबंधित यंत्रणांकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाकडूनही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title: Ganpati bappa immersion complete in ratnagiti ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
1

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
2

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ
3

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा
4

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.