
चिपळूणमध्ये मतमोजणीपूर्वी तणाव
आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
निवेदनावर शिक्कामोर्तब करण्यासाठी माजी आमदार आणि आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश भाई कदम यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यात शिरीष काटकर, फैसल कास्कर, मोहन शेठ मिरगल, निहार गुढेकर, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चिपळूण तालुका अध्यक्ष मुराद आड्रेकर, शहर अध्यक्ष रतन पवार, आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांचा समावेश होता.या बैठकीत उपस्थित असलेल्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही शंका न राहता पूर्ण पारदर्शकता राखली जावी, अशी मागणी केली.
उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
या प्रमुख मागण्यांसह, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांच्यासह नगरसेवक पदाचे तब्बल २६ उमेदवार (आरिफ हजवाने, इम्तियाज मुकादम, अजय भालेकर, वैशाली कदम, शैलेश टाकळे, नसरीन खडस, डॉ. नियाझ पाते, समिधा जोगळे, राहुल कांबळे, सपना पवार, राजेश केळसकर, नगमा रियाने, सुनील कुलकर्णी, साक्षी शिंदे, Adv. अजय कांबळी, नुपुर बचीम, राकेश दाते, युगंधरा शिंदे, सानिका टाकळे, मोहन मिरगल, उमा देसाई, गणेश फके, महाडीक, विकी नरळकर आणि कांचन शिंदे) यांनी स्वाक्षरी करून हे संयुक्त निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आग्रही मागणी या सर्व उमेदवारांनी केली आहे.