
Crime News: चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याची बोरमाळ लंपास; दार तोडून थेट...
चिपळूण शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पेढे वडकरवढी येथे घडली घटना
चिपळूण: शहरालगतच्या पेढे वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी ७.०० वाजण्याच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर उमाजी मंडले (वय ३६, व्यवसाय नोकरी) हे पेढे, वडकर कॉलनी येथील रूम नं. बी-१० येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने कट करून उचकडत दरवाजा उघडला. त्यानंतर फ्लॅटमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेलों २७,७५०/- किमतीची सोन्याची बोरमाळ लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
दार तोडून केली चोरी
याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार यांच्या फ्लॅटचाही दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या परिसरात एकाच रात्रीत दोन घरांमध्ये चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३०५, (क), ३३१ (४) अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत
अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत
बिहारच्या पटना येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका वार्ड नगरसेवकाच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकून जाळल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. २२ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास तरुणीची उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कदायक घटना पटना येथील गोपाळपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेरिया गावात घडली. तिथेही वार्ड नगरसेवक शंभू पासवान यांचा मुलगा आदित्य पासवान याने हा प्रकार तिच्या सोबत केला.
काय घडलं नेमकं?
पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरी राहून शिक्षण पूर्ण करत होती. १७ जानेवारीला पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरातून तिच्या घरात परतत असतांना एका पिपमळाच्या झाडाजवळ आदित्यने रोखलं. तो तिच्याशी बोलण्याचा हट्ट करू लागला. तेव्हा पीडितेने नकार दिला. यावरून आरोपी संतापला त्याने आधी तिला धमकावलं नंतर तिला एक फोटो दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर तिला जाळून टाकणार असल्याचं देखील त्याने सांगितलं.