
कोकणात 'या' नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने...
जिप, पंस निवडणुका आमदार जाधवांच्या नेतृत्वाखालीच
पक्ष सचिव विनायक राऊतांचे स्पष्ट आदेश
जाधव-राऊत अंतर्गत वादावर पडदा ?
चिपळूण: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चिपळुणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची राजकीय दिशा स्पष्ट झाली असून, ही निवडणूक पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव-राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी बिपळुणातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
पक्षाला मोठा फटका
९ जिप, १८ पस गणांसाठी उमेदवारांची निवड या निवडणुकीत महाविकास आघाडी व्यवी, अशी सुरुवातीपासूनच इच्छा होती व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र अंतिम निर्णय येत्या काळातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, विशेष महणजे, नगरपालिका निवडणुकीदस्यान आ. भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊत यांचे स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे स्पष्टचित्र होते, त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. मात्र, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच लढवाव्यात, अस स्पष्ट आदेश दिल्यांनतर आता पक्षांतर्गत वाद संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बैठक ठाकरे गटासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे
उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनच घ्यावेत असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे, तथापि, या बैठकीचे निमंत्रण आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले नसल्याने ते उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक नेतृत्य ते स्वीकारणार की नाही, हे येणा-या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, स्वतः उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.