
Raigad News: निवडणूक नियमांची पायमल्ली? २ उमेदवारांनी अनामत रक्कम भरली नाही, छाननीमध्ये उघड झाली धक्कादायक माहिती
कर्जत तालुक्यात असलेल्या ६ जिल्हा परिषद गटामध्ये ४९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जाची छाननी प्रशासकीय भवन येथे असलेली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी प्रकाश संकपाळ आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली. (फोटो सौजन्य – AI Created)
कर्जत तालुक्यातील ६ गटातील कळंब गटात सहा, कशेळे गटात तीन, माणगाव तर्फे वरेडी गटात १३, नेरळ गटात ११, कडाव गटात ११ आणि मोठे वेणगाव या गटात पाच असे ४९ नामांकन अर्ज यांची छाननी करण्यात आली. त्यावेळी अनेक उमेदवार यांनी आपले अधिकृत पक्ष तसेच अपक्ष म्हणून देखील अर्ज दाखल केले होते. अशा दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणि त्यामुळे दाखल असलेले सर्व उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दामत पंचायत समिती गणामध्ये अर्ज भरणारे मंगेश गायकवाड या उमेदवाराने अनामत रक्कम तसेच शपथपत्र अपूर्ण ठेवले होते. तर बीड बुद्रुक या गणामध्ये अर्ज दाखल करणाऱ्या मीना काकडे यांनी देखील अनामत रक्कम भरली नाही आणि शपथपत्र अपूर्ण होते. त्यामुळे या दोन उमेदवारांचे अर्ज बाद आहेत. त्यामुळे आता ६ जिल्हा परिषद गटासाठी ४५ आणि १२ पंचायत समिती गणासाठी ७८ अर्ज वैद्य ठरले आहेत. वैद्य अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी दुपारी तीन पर्यंत आहे. त्यानंतर कर्जत तालुक्यातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
| गणांमध्ये एकूण १२ तब्बल ८० अर्ज दाखल | |||
|---|---|---|---|
| गण | एकूण अर्ज | गण | एकूण अर्ज |
| पोशीर | २ | माणगाव तर्फे वरेडी | ७ |
| कळंब | १० | उकरुळ | ९ |
| पाथरज | ३ | नेरळ | ११ |
| कशेळे | ५ | दामत | ७ |
| वाकस | १० | मोठे वेणगाव | ५ |
| कडाव | ३ | बीड बुद्रुक | ८ |