Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

जिल्हा आढावा बैठकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल तीन इच्छुक पुढे आले, तर २८ नगरसेवकपदांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धा आता उघडपणे समोर आली असून, पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस आणि शाब्दिक खडाजंगी झाल्या

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 10:00 PM
चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली (Photo Credit - x)

चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली (Photo Credit - x)

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा आढावा बैठकीत उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी
  • नगराध्यक्षपदासाठी तीन
  • तर २८ जागांसाठी ३३ अर्ज दाखल

चिपळूण: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील काँग्रेस पक्षात जोरदार राजकीय खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरात धवल प्लाझा सभागृहात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत नगराध्यक्षपदासाठी तब्बल तीन इच्छुक पुढे आले, तर २८ नगरसेवकपदांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धा आता उघडपणे समोर आली असून, पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस आणि शाब्दिक खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावचकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष आणि युवक व महिला काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदावरून वादंग

बैठकीत नगराध्यक्षपदाची चर्चा सुरू होताच, पहिले नाव तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांचे समोर आले. मात्र, काही पदाधिकाऱ्यांनी ॲड. जीवन रेळेकर यांचे नाव पुढे केले. या दोन नावांवरूनच चर्चा चांगलीच तापली आणि वादाचे स्वरूप घेताना, “पक्षासाठी कोण किती योगदान देतो” इथपर्यंत बोलाचाली गेली. या दोन नावांवर एवढा गदारोळ झाला की, पक्षाकडे अर्जाद्वारे दाखल झालेल्या तिसऱ्या इच्छुक उमेदवाराबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही! २८ जागांसाठी ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अनेक प्रभागांत दोन ते तीन इच्छुक समोर आले आहेत, ज्यामुळे तिथेही छोटी धुसफूस सुरू आहे.

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

स्वबळाचा संकल्प की महाविकास आघाडीचा धर्म?

या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडून सन्मानपूर्वक न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल, असा स्पष्ट पवित्रा काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना साथ दिली असली तरी, आता स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीकडे पाहता, काँग्रेससाठी ही निवडणूक मतदारांपेक्षा अंतर्गत गटबाजीमुळे जास्त आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यापुढे “तीन नगराध्यक्ष, ३३ नगरसेवक आणि अनेक मतप्रवाह” असा मोठा पेच उभा राहिला आहे.

Web Title: In chiplun there is a lot of confusion within the congress party for the post of mayor 33 are interested in the post of corporator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Chiplun
  • Congress

संबंधित बातम्या

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी
1

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
2

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, तर…; काँग्रेसची मागणी
3

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, तर…; काँग्रेसची मागणी

Khed: भरणे-दापोली रस्ता कामाला विलंब! काँग्रेसचा इशारा; “महिनाभरात काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडू”
4

Khed: भरणे-दापोली रस्ता कामाला विलंब! काँग्रेसचा इशारा; “महिनाभरात काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडू”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.