Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

IIT Bombay Sahil Wakode Case : IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी या घटनेला ‘संस्थात्मक मृत्यू’ म्हणत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, साहिलच्या मृत्यूपूर्वीचा परीक्षा केंद्रातील CCTVही समोर आला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 03:32 PM
साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून राजकारण तापलं; वर्षा गायकवाडांचा IIT मुंबईबाहेर जोरदार एल्गार

साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून राजकारण तापलं; वर्षा गायकवाडांचा IIT मुंबईबाहेर जोरदार एल्गार

Follow Us
Follow Us:
  • IIT मुंबईबाहेर काँग्रेस आणि NSUIचं आंदोलन; वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
  • वर्षा गायकवाड यांनी साहिलच्या मृत्यूला ‘संस्थात्मक मृत्यू’ म्हणत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर आरोप केले.
  • परीक्षा केंद्रातील CCTV समोर, पोलिसांकडून तपास सुरू 
 

IIT Bombay Sahil Wakode Case : मुंबईतील IIT मुंबईमध्ये विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप, पोलिसांकडून सुरू असलेला तपास आणि आता समोर आलेलं CCTV फुटेज यामुळे या प्रकरणाची चर्चा देशभरात होत आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर जातीय भेदभाव आणि मानसिक छळ झाल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, IIT मुंबईने अशा प्रकारची तक्रार विद्यार्थ्याने संस्थेच्या SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे केली नसल्याचं म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा

दरम्यान, साहिल वाकोडेच्या मृत्यूवरून IIT मुंबईबाहेर आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे. गुरुवारी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि NSUIच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. साहिल वाकोडे प्रकरण हे ‘संस्थात्मक मृत्यू’ असल्याचा आरोप त्यांनी केला.

वर्षा गायकवाड यांनी IIT मुंबई आणि मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थेतील कथित विरोधाभासाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शिक्षण व्यवस्थेत जातीय भेदभाव होत असल्याचा आणि संस्थांमध्ये RSSचा प्रभाव वाढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, हे राजकीय आरोप असून त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. दुसरीकडे, साहिलच्या काही वर्गमित्रांनी जातीय भेदभावाच्या आरोपांशी असहमती व्यक्त केली असल्याचेही वृत्त आहे.

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

साहिलचा परीक्षा केंद्रातील CCTV समोर

या सगळ्या प्रकरणात CCTV फुटेज महत्त्वाचं ठरत आहे. समोर आलेल्या फुटेजनुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे काहीतरी पाहिल्याचं लक्षात आल्यानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर साहिलला परीक्षा कक्षातून बाहेर जाताना पाहायला मिळतं. पोलिसांच्या तपासात या घटनाक्रमाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

साहिलच्या मृत्यूनंतर IIT मुंबईने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन केली आहे. मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँचदेखील CCTV आणि संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब तपासत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं, साहिल आणि प्राध्यापकांमध्ये काय संवाद झाला आणि त्यानंतरच्या घटनांचा मृत्यूशी काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

Web Title: Iit bombay sahil wakode case varsha gaikwad protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Congress
  • IIT Bombay
  • Sahil Wakode
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य
1

Sonia Gandhi Book : सोनिया गांधींचा मोठा खुलासा! आणीबाणीवरून राजीव – संजय गांधींमध्ये झाला होता वाद; इंदिरा गांधींची चूकही मान्य

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं
2

Hasan Mushrif ED Case : 2700 पानांची तक्रार कुठे गेली? हसन मुश्रीफ प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपला घेरलं

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
3

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
4

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.