Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टीत दरवाढ नाही, नगर परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Ratnagiri: नगरसेविका सायली पाटील यांनी हे तलावातील पाणी उपसताना परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाला केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 02:40 PM
घरगुती पाणीपट्टी दरवाढ टळली

घरगुती पाणीपट्टी दरवाढ टळली

Follow Us
Follow Us:
  • घरगुती पाणीपट्टी दरवाढ टळली
  • एक इंची नळजोडणीच्या परवानग्या स्थगित
  • विनापरवानगी बांधकामाकडे प्रशासनाचे वेधले लक्ष
Ratnagiri: रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी एक महत्त्वाची सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यामध्ये शहराच्या पाणी पुरवठ्यातील तोटा कमी करण्यावर सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा योजना किमान ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर आणण्याचा प्रस्ताव सभापती निमेश नायर यांनी या वेळी सभागृहासमोर मांडला.

पाणीपुरवठ्यावर वर्षाला तब्बल ९ कोटी रुपये खर्च होत असताना पाणीपट्टीमधून केवळ ४ कोटी रुपये उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रचंड आर्थिक तफावतीमुळे पाणीपट्टीचे दर वाढवणे गरजेचे बनले होते, ज्यामुळे प्रशासनासमोर दरवाढीचा प्रस्ताव आला होता. परंतु, सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा देत घरगुती वापराच्या पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करण्याचा सर्वांच्या संमतीने ठराव मंजूर करण्यात आला.

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

एक इंची नळजोडणीच्या परवानग्या स्थगित

तसेच, नगर परिषदेच्या लघुउद्योग वसाहतीतील भूखंडांना मुदतवाढ देताना त्यांचे फेरमूल्यांकन करून देण्याचा महत्वपूर्ण ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला. मागील सभेतील मुदद्याचा धागा पकडत भाजपा पक्षप्रतोद राजू तोडणकर यांनी उद्योग सुरू न केलेल्या भूखंडांच्या स्थितीबद्दल जास्तीची विचारणा केली. यावर मालमत्ता विभागाचे अधिकारी विजय कदम यांनी काही भूखंडधारकांनी एक वर्षांची मुदतवाढ मिळावी म्हणून लेखी अर्ज केल्याचे सांगितले, इमारत बांधकामांसाठी, सर्व्हिसिंग रॅम्पसाठी देण्यात आलेल्या एक इंची नळजोडणीच्या परवानग्या तत्काळ स्थगित करण्याचा अतिशय महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.

भूमिकेचे सर्वत्र स्वागत

नगरसेविका सायली पाटील यांनी हे तलावातील पाणी उपसताना परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाला केली. या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर झालेल्या सखोल चर्चेत अमित विलणकर, सुहेल मुकादम, राजन शेट्ये, मेधा कुलकर्णी आणि उपनगराध्यक्षा समीर तिवरेकर आदी प्रमुख नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नगरसेवकांची ही जनहिताची सूचना लगेचच मान्य करत तसे आदेश संबंधित यंत्रणेला दिले, या सर्वसाधारण सभेमध्ये शहर विकासाचे अनेक प्रश्न, पाणीपुरवठ्याचे गणित आणि अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्यासारखे अनेक विषय मार्गी लागले,

क्रिकेटचा सामना संपला अन् दोघे पोहण्यासाठी डोहात उतरले; पण काही क्षणांत असं काय घडलं की कल्याणच्या दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: रत्नागिरी नगर परिषदेत कोणता ठराव मंजूर झाला?

    Ans: रत्नागिरी नगर परिषदेत भूखंडांना मुदतवाढ देताना त्यांचे फेरमूल्यांकन करून देण्याचा निर्णय घेतला गेला.

  • Que: सभापती निमेश नायर कोणता प्रस्ताव मांडला?

    Ans: सभापती निमेश नायर यांनी पाणीपुरवठा योजना किमान 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर आणण्याचा प्रस्ताव मांडला.

Web Title: Ratnagiri nagar parishad cancel water tax tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • ratnagiri news
  • water news

संबंधित बातम्या

Mumbai-Goa Highway Update: माणगाव-इंदापूर बायपाससाठी कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक
1

Mumbai-Goa Highway Update: माणगाव-इंदापूर बायपाससाठी कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.