Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला! रत्नागिरी जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याच्या हालचाली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाटपन्हाळे, कोंडवाडी, मोडकाआगर, वरवेली परिसर तसेच त्रिशूळसाखरी, खोडदे, तळवली, परचुरी या गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 02:23 PM
आला रे आला! रत्नागिरी जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याच्या हालचाली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow Us
Follow Us:

गुहागरमध्ये बिबट्याची दहशत
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण 
वनविभागाकडून पिंजरा लावण्याचे प्रयत्न

गुहागर: गुहागर तालुक्यातील ग्रामीण व काही शहरी भागांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. नुकतेच पाटपन्हाळे येथील सावंतवाडी परिसरात एका गायीवर (Ratnagiri) बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्या गायीचा मृत्यू झाला. तसेच चिखली बौद्धवाडी येथेही एका पाड्यावर हल्ला होऊन तो ठार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. भरवस्तीत आणि घरांच्या आवारातही बिबट्याच्या वावराच्या घटना वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाटपन्हाळे, कोंडवाडी, मोडकाआगर, वरवेली परिसर तसेच त्रिशूळसाखरी, खोडदे, तळवली, परचुरी या गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

बिबट्या हू, वापस आता ही हू! ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्‌याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आसपासच्या वाड्यांमध्ये आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

अचानक वासरावर हल्ला
मंगळवारी रात्री बलभीमवाडी येथील प्रदीप पवार यांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. प्राण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरच्यांनी धाव घेतली, तेव्हा बिबट्या तेथून पसार झाला. मात्र, या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Leopard actions in guhagar rural and urban area fear in people forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Leopard
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
2

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
3

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.