Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Fire: फर्निचर तयार करण्यासाठी मालानी यांनी सुमारे ४ कोटी खर्चाच्या १२ मशिनरी परदेशातून आयात केल्या होत्या. घरासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे फर्निचर येथे तयार केले जात होते.  नामवंत कंपन्यांचे तयार फर्निचर देखील विक्रीस ठेवले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 02:35 AM
Kherdi Midc Fire

Kherdi Midc Fire

Follow Us
Follow Us:
  • खेर्डी एमआयडीसीत कारखान्याला आग
  • अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न,
  • कारखान्याचे कोट्यवधींचे नुकसान
Kherdi Midc Fire/Ratnagiri: चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील इम्पेरियल ट्रेडर्स फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यास लागलेल्या आगीत संपुर्ण कारखाना जळून खाक झाला. रात्रभर तिन अग्नीशमन बंबाच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरूवारी पहाटे पाच वाजता आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा काही काळाने पेट घेतला. जवळपास १५ तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून परदेशातून आयात केलेल्या १२ मशिनरीसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार निहाल मालाणी सोहेल फजलानी यांनी पार्टनरशिपमध्ये खेडर्डी एमआयडीसीत २०२१ मध्ये इम्पेरिअल ट्रेडर्स हा फर्निचर तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. ८ ते १० कामगार येथे कार्यरत होते.

३ अग्निशामक बंबांची घेतली मदत
फर्निचर तयार करण्यासाठी मालानी यांनी सुमारे ४ कोटी खर्चाच्या १२ मशिनरी परदेशातून आयात केल्या होत्या. घरासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे फर्निचर येथे तयार केले जात होते.  नामवंत कंपन्यांचे तयार फर्निचर देखील विक्रीस ठेवले होते. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कंपनी बंद झाल्यानंतर सर्व कामगार निघून केले.

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

साधारणतः ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास कंपनीस आग लागल्याची माहिती मालानी-फजलानी यांना मिळाली. तेथून चिपळूण पालिकेसह लोटेतील अग्नीशमक बंबास पाचारण करण्यात आले. बंब येईपर्यंत आग वाढतच गेली. मदत कार्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. मात्र, कंपनीच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने मदत कार्यास अडचणी येत होत्या. ३ अग्नीशमक बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रात्री एक वाजता आग आटोक्यात आली. परंतू कंपनीत लाकडाचे साहित्य अधिक आणि भसा जास्त असल्याने आग पन्हा पन्हा धमसत होती.

लोखंडी साहित्य वगळता कंपनीत काहीच शिल्लक राहिले नाही
गुरूवारी पहाटे ५ पर्यंत बंबाच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सकाळी साडेनऊच्या दरम्यान पुन्हा आग भडकली. अर्धवट जळालेले साहित्य पुन्हा जळत होते. साडेदहाच्या सुमारास चिपळूण पालिका आणि लोटेतील अग्नीशमक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. ५ वर्षापूर्वी ही फर्निचर कंपनी सुरू झाली. कंपनी इमारतीच्या शेडसाठी हेव्ही लोखंडी चिम टाकण्यात आले होते. मात्र, आगीच्या तडाक्यात हे बिम देखील गरम होऊन वाकले होते. लोखंडी साहित्य वगळता कंपनीत काहीच शिल्लक राहिले नव्हते.

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Web Title: Massive fire in furniture mill at kherdi midc chiplun ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Fire News
  • MIDC
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
1

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
2

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
3

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.