Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…

Ganeshotsav 2026: रस्तेकामे अपूर्ण असतानाच रेल्वेमार्गातही अडथळे निर्माण झाले आहे. १० सप्टेंबरपासून पुढीलकाही दिवसांचे कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2026 | 02:53 PM
मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्णच

मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्णच

Follow Us
Follow Us:
  • कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’
  • नागोठणेतील पूल बंदमुळे प्रवास ठरतोय अडचणीचा 
  • रेल्वे गाड्यांची संख्या तुलनेत अपुरीच 
गुहागर: गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस राहिले असतानाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाटेतील अडथळे दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची कामे अजूनही अपूर्ण आहेत, तर कोकण मार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रेल्वेगाड्यांचे तिकीट मिळणेही आता अशक्य झाले आहे. रस्ते व रेल्वेमार्गातील ‘विघ्ने’ दूर करण्यास यंत्रणांना अपयश आल्याने कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी पुलाच्या संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच या पुलावरील वाहतूक सुरू करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गाची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोकण रेल्वेने तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यास नकार दिल्याने, हे काम आता पूर्ण होणार नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम

रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेत अपुरी

रस्तेकामे अपूर्ण असतानाच रेल्वेमार्गातही अडथळे निर्माण झाले आहे. १० सप्टेंबरपासून पुढीलकाही दिवसांचे कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा वादीही पूर्ण झाल्याने आता ‘रिग्रेट’ (प्रतीक्षा यादीही बंद) असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. गणेशोत्सवासाठी ११ आणि १२ सप्टेंबर रोजी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले. मात्र, मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्‌यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना तिकीट मिळू शकलेले नाही. प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्यामुळे रेल्वेने आता थेट तिकीट विक्रीच बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

रेल्वे आरक्षणात अडथळे

जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस,, तुतारी एक्सप्रेस, सुरत-मडगाव एक्सप्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस.

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

नागोठणेतील पूल बंदमुळे प्रवास ठरतोय अडचणीचा

मुंबई-गोवा महामार्गांचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा यंत्रणाकडून केला जात आहे, मात्र महामागविरील पुलांची आणि बाहावळण मार्गाची कामे अजूनही अपूर्ण आहेत, महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही अपूर्ण आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी चंद आहे.

Web Title: Mumabi goa national highway issue at railway reservation kokan travel ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
1

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Ganesh Chaturthi: तुळशीने गणपतीला दिला होता शाप? जाणून घ्या तुळस न वाहण्यामागची पौराणिक कथा
2

Ganesh Chaturthi: तुळशीने गणपतीला दिला होता शाप? जाणून घ्या तुळस न वाहण्यामागची पौराणिक कथा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
3

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
4

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.