मुंबई-गोवा हायवे (फोटो-सोशल मिडिया)
महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात येणारे सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी अद्याप जोडले गेलेले नाहीत, परिणामी स्थानिक नागरिकांना नाईलाजाने मुख्य महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे.
एका बाजूला भरधाव वाहने आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांची वाहतूक, अशा जीवघेण्या परिस्थितीत अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेषतः मोठी गैरसोय होत आहे.
मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी
पावसाळ्यात अंडरपासची अवस्थाही गंभीर झाली आहे. भरणे परिसरातील पादचारी भुयारी मार्गात पाणी साचल्याचे चित्र असून, अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे नागरिकांना त्यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. ज्या अंडरपासचा उद्देश नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडण्याची सुविधा देणे हा आहे, त्याच ठिकाणी पाणी साचत असेल तर या सुविधेचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रवास जलद, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र १८ वर्षांनंतरही सर्व्हिस रोड, अंडरपास आणि पादचारी पूल पूर्ण होत नसतील, तर चौपदरीकरण नेमके कोणासाठी आणि कशासाठी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला. मात्र त्यानंतरही प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर जबाबदारी नेमकी कोणाची? काने रखडण्यामागे कारण कोणती आणि त्यासाठी जबाबदार अधिका-यावर कारवाई कची होणार, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे. दरम्यान, नुकत्याच कोकण दौऱ्यावर आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेच ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून सरकारवर टीका केली. महामार्गाच्या कामाला तब्बल १८ वर्षांचा कालावधी उत्लटूनही प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याने संबंधित यंत्रणाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
स्व भा






