Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा; लोकांमध्ये विश्वास निर्माण करा; नव्या जोमाने कामाला लागा- प्रशांत यादव

चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या बैठकीत प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना लोकांमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली.

  • By नारायण परब
Updated On: Dec 19, 2024 | 09:45 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांच्या दृष्टीने लोकांमध्ये जा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. लोकांमध्ये विश्वास निर्माण करा.कार्यकर्ते निर्माण करा. नव्या जोमाने कामाला लागा. तरच तुम्हाला निवडणुका सोप्या होतील. जिथं तुम्हाला सहकार्य अपेक्षित आहे, तिथे आम्ही असू काळजी करू नका. माझी निवडणूक झाली म्हणून बाजूला होणार नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सोबत राहणार आहे. महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात पक्षाच्या आयोजित बैठकीत दिली.

यावेळी माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा राधा शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ओबीसी सेल चिपळूण तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, दत्ता पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष योगेश शिर्के, ऍड. नयना पवार, युवकचे तालुकाध्यक्ष रोहन नलावडे आदी उपस्थित होते.

पुढच्या काळात कार्यकर्ते जास्त तयार व्हायला पाहिजेत

यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने आपले मनोगते मांडली. तर प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरीष्ठ नेते व तुम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात. यामुळे कमी कालावधीत देखील आपण चांगली लढत देऊ शकलो. तरीही आपण सर्वांनी खचून न जाता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागुया, असे आवाहन करतांना आपल्याकडे नेते जास्त कार्यकर्ते कमी तेव्हा पुढच्या काळात कार्यकर्ते जास्त तयार व्हायला पाहिजेत. एकमेकांना मान सन्मान द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यादव यांनी विश्वास दिला.

प्रशांत यादव यांना दुसऱ्यावेळी यश नक्कीच मिळेल

तर माजी आमदार रमेश कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, संघटन वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया! विधानसभा निवडणुकीत कमी कालावधी मिळाला. परंतु आपण चांगली लढत दिली. कोणत्या चुका झाल्या आहेत, हे आमच्या लक्षात आले आहे. समोरच्या उमेदवाराने गेली दहा वर्षे काम केले होते. ते सुखदुःखात सहभागी होत आले आहेत. आम्ही २५ हजार मताधिक्याची तयारी केली असती तर विजय नक्कीच असता. मात्र, आता पुढील निवडणुकांच्या दृष्टीने गाव निहाय दौरे करून संघटन करूया. येत्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती तीच राहील हे माहीत नाही. परंतु आपले संघटन असणे आवश्यक आहे. पहिल्या निवडणुकीत मला अपयश आले होते. दुसऱ्या निवडणुकीत यश मिळाले. तसे प्रशांत यादव यांना दुसऱ्यावेळी यश नक्कीच मिळेल, असा आशावाद यादव यांच्या विषयी रमेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला. जिद्द ठेवा पुढच्या काळात आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. या निवडणुकीत तुमच्याकडून चुका झाल्या नाहीत तर आमच्याकडून झाल्या आहेत त्या नक्कीच सुधारण्यासाठी प्रयत्न करू! अशी ग्वाही रमेश कदम यांनी यावेळी दिली.

यावेळी सतीश खेडेकर, सीताराम शिंदे, वासुदेव मेस्त्री, दिनेश शिंदे, माजी नगरसेवक अविनाश केळसकर, हिंदुराव पवार, संजय गमरे, फैसल पिलपिले, जनार्दन पवार, रुपेश आवले, शमून घारे, सचिन मोहिते, तसेच महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Nationalist congress party leader prashant yadav inspired the workers to work among the people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:45 PM

Topics:  

  • Kokan News
  • NCP Sharad Chandra Pawar Party
  • Prashant Yadav

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
1

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन
2

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन

Pune News : शरद पवार पक्ष आक्रमक; माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन
3

Pune News : शरद पवार पक्ष आक्रमक; माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Sindhudurg :  उधाणामुळे तळाशीलचा किनारा धोक्यात, ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी ‪
4

Sindhudurg : उधाणामुळे तळाशीलचा किनारा धोक्यात, ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.