Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Footbridge Construction : भु गावातील पूलाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Footbridge Construction : राजापूर तालुक्यातील भु गावात बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर समाजकल्याण विभागाच्या निधीतून सुमारे ६० लाख रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतुकीची गैरसोय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 02, 2026 | 03:26 PM
भु गावातील साकवाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

भु गावातील साकवाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • पूलाचा निधी वाया गेल्याचा आरोप  
  • पूलाचे काम चुकीच्या पद्धतीने 
  • ६० लाख रुपयांचा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला का ?
Footbridge Construction : राजापूर तालुक्यातील भु गावात बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर समाजकल्याण विभागाच्या निधीतून सुमारे ६० लाख रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला होता. पूल बांधण्यात आलेल्या कामावर आता गावातील नागरिकांनी यावर  गंभीर आक्षेप घेतला आहे. पूलाचे बांधकाम झाल्यानंतरही पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसल्याने वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे. असा आरोप गावीतील नागरिकांनी केला आहे.

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

पूलाचा निधी वाया गेल्याचा आरोप 

या पूलासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून देखिल प्रत्यक्षात रस्त्याची परिस्थिती सुधारली नसल्यामुळे या पूलाचा निधी वाया गेल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक करणे अवघड झाले आहे. गावातील आजारी रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जातानाही कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे गवातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पूलाचे काम चुकीच्या पद्धतीने

पूलाचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने सुरुवातीच्या काळात एका महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाही. या मुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप देखिल ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर पूलाचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याबाबत ठेकेदार तसेच जिल्हा परिषद अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण मात्र, त्यानंतरही संबंधित काम पुढे सुरू ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पूलाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असतानाही पूलाचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे  या संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

६० लाख रुपयांचा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला का ?

समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या तब्बल ६० लाख रुपयांचा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला का ? सदर पूलाच्या कामाची गुणवत्ता आणि अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे का; तसेच पूलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम अपूर्ण का ठेवण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी राजापूर तालुक्यातील भु गावातील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच जिल्हा परिषद प्रशासनाची भूमिका काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Web Title: Rajapur bhu village 60 lakh bridge construction fund allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Accident in Rajapur
  • Rajapur News Update
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
3

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
4

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.