Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri जिल्ह्यात वाढला उन्हाचा पारा; डॉक्टरांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 03:29 PM
Ratnagiri जिल्ह्यात वाढला उन्हाचा पारा; शल्यचिकित्सकांनी नागरिकांना केले 'हे' आवाहन

Ratnagiri जिल्ह्यात वाढला उन्हाचा पारा; शल्यचिकित्सकांनी नागरिकांना केले 'हे' आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा शल्यचिकित्सकांचा सल्ला
उष्माघात टाळण्यासाठी सूचनांचे पालन गरजेचे
राज्यात अनेक भागात कडक उन्हाळा

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी केले आहे.

उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अतिसार, उलट्या, चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे, डोकेदुखी किंवा अस्वस्थता, त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. उष्माघात हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेल्या पेयांचे सेवन टाळणे, शिळे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळणे, कडक उन्हात कष्टाची किंवा व्यायामाची कामे करणे टाळणे या गोष्टी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस, नारळ पाणी आणि घरगुती नैसर्गिक पेयांचे सेवन करणे, हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, आहारात काकडी, टरबूज, द्राक्षे यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करणे यांसारखे कृती करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुचविले आहे.

Pune Weather: पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात…

जर एखाद्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली किंवा बेशुद्ध पडल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत किवा थंड ठिकाणी न्यावे, थंड पाण्याने शरीर पुसून काढावे.  तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उष्णतेच्या लाटेत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहीही त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.

पुणेकर उकाड्याने हैराण

 

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

Web Title: Ratnagiri dristrict surgeon appeal to people summer waves weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Heat Waves
  • ratnagiri news
  • summer care tips

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

El Nino 2026: पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! ‘एल निनो’च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; समुद्राचे वाढते तापमान जगाला विनाशाकडे नेणार
3

El Nino 2026: पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! ‘एल निनो’च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; समुद्राचे वाढते तापमान जगाला विनाशाकडे नेणार

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण
4

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.