Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे

चिपळूणमध्ये आनुधिक तंत्रज्ञानाने विकसित अशा शेतीच्या कामाबाबत कार्यशाळा घेण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्य़ात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 03, 2025 | 02:04 PM
Ratnagiri News :  शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यशाळा: कात्रोळीत आधुनिक शेतीचे गिरवले धडे
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण :- तालुक्यातील कात्रोळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात ‘आपला कृषिसखा परिवार’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरलेल्या या कार्यशाळेत भात पिकावरील कीड नियंत्रण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पिकांची माहिती, मृदा परीक्षण, सिंचन व्यवस्थापन आणि विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.

कार्यशाळेचे मुख्य आकर्षण होते सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांचे प्रभावी मार्गदर्शन ठरले. यावेळी डॉ. मोहिते यांनी त्यांच्या अफाट अनुभवाने आणि सखोल ज्ञानाने शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष शेतात उपयोगी ठरणारी व्यावहारिक माहिती दिली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य हेच या कार्यशाळेच्या यशाची पावती होती.

कार्यशाळेतील प्रमुख विषय भात पिकावरील कीड नियंत्रण हा होता. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जाते. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि नवीन कीटकांच्या प्रादुर्भावामुळे भात उत्पादकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डॉ. मोहिते यांनी भात पिकाला साधारणतः कोणत्या किडींचा धोका असतो, त्या किडींची ओळख कशी करावी, आणि त्यांच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक व रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे (IPM) महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

याव्यतिरिक्त, मृदा परीक्षण (Soil Testing) का महत्वाचे आहे, मृदा परीक्षणाचे फायदे काय आहेत आणि त्यासाठी सरकारने कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, यावरही मार्गदर्शन झाले. सिंचन व्यवस्थापनातील (Irrigation Management) आधुनिक तंत्रज्ञान, जसे की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत कशी करावी आणि पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, याबाबतही माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती, जसे की कृषी कर्ज, पीक विमा योजना, शेततळे योजना आणि अनुदानावर मिळणारे कृषी साहित्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

‘आपला कृषिसखा परिवार’ने शेतकऱ्यांसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्‍वास निर्माण झाला असून, त्यांना आधुनिक शेतीत तंत्रज्ञान आत्मसात करून आपली शेती अधिक किफायतशीर आणि समृद्ध करण्यास निश्चितच मदत झाली आहे.

या कार्यशाळेसाठी चे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे , ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवलेयांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी डॉ.पांडुरंग मोहिते ,प्राध्यापक अनिल कांबळे, प्राध्यापक समेद वडगावे गावचे सरपंच श्रीकांत निवळकर आणि गावातले प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पाडण्यासाठी कृषिसखा ग्रुपचे सर्व कृषिदूत आनंद नलावडे,स्वयं बारी,अनिरुद्ध घंटे,सत्यजित आसने,घनश्याम राऊत,ईशान डुंबरे,साहिल रसाळ,प्रतिक नाईक, श्रेयस सावंत,अंकुश पवार,श्रीगोपाल नायर आणि
रुदुल आखाडे हे सर्वजण उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri news agricultural workshop for farmers lessons learned in modern agriculture in katroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण
1

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

Ratnagiri News : प्रीपेड स्मार्ट मीटरवर नागरिकांचा संताप; ठाकरे गटाची महावितरणावर धडक
2

Ratnagiri News : प्रीपेड स्मार्ट मीटरवर नागरिकांचा संताप; ठाकरे गटाची महावितरणावर धडक

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
3

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी
4

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.