चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महावितरण अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. यापुढे स्मार्ट मीटर लागता कामा नये तसेच चार दिवसात खराब स्मार्ट मीटर बदलून आणि ग्राहकांची इच्छा नसेल असे स्मार्ट मिटर बदलून जुने मीटर लावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने मीटर बदलणार असा इशारा देण्यात आला.
मीटबाबत दिलेल्या निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे की, खेर्डी गावातील आणि परिसरात अलीकडेच प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर बसवल्यानंतर सर्वसाधारण ग्राहकांचे वीज बिल लक्षणीयरित्या वाढले असून अनेकांना दुप्पट बिल येऊ लागले आहे. त्या संदर्भात खालील अडचणी निदर्शनास आल्या आहेत.अतिरिक्त बिलिंग प्रीपेड मीटर बसवल्यानंतर बिल दुप्पट होत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण येत आहे.सिम कार्ड प्रणालीतील बिघाड मीटरमध्ये बसविलेल्या सिम कार्ड प्रणालीत तांत्रिक अडचणी असल्याने चुकीचे युनिट दाखवले जाते, त्याचा परिणाम चुकीच्या बिलावर होतो.
स्मार्ट मीटरवरील लाल दिवे (LED): तीन रेड लाईटपैकी (स्टेटस, फेज, पल्स, काउंटिंग) दोन दिवे (स्टेटस व फेज) कायम चालू राहतात. त्यामुळे वाचनावर परिणाम होत असल्याचे दिसते.
दरवाढीचा परिणाम : सरकारने वीज युनिटचे दर वाढवले असल्याने बिलात आणखी वाढ झाली आहे.वाचन पध्दतीतील बदल पुर्वी अधिकृत ठेकेदारांकडून प्रत्यक्ष मीटर वाचन होत होते, मात्र आता ऑटोमॅटिक रीडिंगमुळे चुकीचे वाचन होत आहेत.मीटरची उच्च किंमत व देखभाल खर्च प्रीपेड मीटरची किंमत पूर्वीच्या मीटरपेक्षा खूप जास्त आहे. जर मीटर जळाले अथवा बिघडले तर नवीन मीटरचे शुल्क ग्राहकांकडून घेतले जाते, जे परवडणारे नाही.वरील सर्व बाबींचा विचार करता, या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बसवणीसंदर्भात पुनर्विचार करावा. तसेच या पुढे गावात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवता कामा नये.
तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी या मीटरच्या स्थापनेवर तात्काळ स्थगिती देण्यात यांची किंवा योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच स्मार्ट मीटर बदलून पुन्हा जुने मीटर लावण्यात यावे. अन्यथा आम्ही स्वतः मीटर बदलून जुने मीटर लावणार वेळ पडली तर आमच्या वर गुन्हा दाखल करा आम्ही सर्व सामान्य नागरिकांसाठी गुन्हे घेयला तयार आहोत, असे युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते यांनी सांगितले.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, शिवसेना विभाग प्रमुख विजय शिर्के, दत्ताराम पवार, विभाग प्रमुख शशिकांत कासार, सुबोध सावंतदेसाई, युवासेना विभाग प्रमुख राहुल भोसले, शाखा प्रमुख समीर कदम, उपशाखा प्रमुख कमाल बंदरकर, मुसा चौगुले, बाळशेठ दाभोलकर, विराज खताते, बाबा सुर्वे, शैलेश किंजले, इम्रान कुरेशी, प्रदीप खैर, मनोज चव्हाण, पाडुंरंग शिगवण, निलेश शिगवण आदी गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.