Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 13, 2025 | 01:13 PM
Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यानंतर चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आघाडीने सादर केलेल्या निवेदनात जनसुरक्षा विधेयकाला “जनविरोधी, घटनाविरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्ती वाढवणारे” संबोधत त्याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या विधेयकामुळे शासनाला अमर्याद अधिकार प्राप्त होऊन कोणत्याही नागरिकावर शंका उपस्थित करून अटक, चौकशी, नजरकैद करण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्याचा हक्क धोक्यात येतो, असा आरोप निवेदनात करण्यात आला.

Kokan Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी

लोकशाहीची गळचेपी केली तर…

लोकशाहीची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. हे विधेयक मागे घेतले नाही तर आंदोलनाचा ज्वालामुखी उभा राहील”, असा इशारा महाविकास आघाडीने दिला.यावेळी उपस्थित नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुराद अडरेकर यांनी निवेदन वाचून दाखवले तर बाळा कदम व लियाकत शाह यांनी शासनाच्या हुकूमशाहीविरोधात तीव्र भूमिका मांडली. या आंदोलनातून महाविकास आघाडीची चिपळूणमध्ये एकजूट ठळकपणे दिसून आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटक, राजू देवळेकर, उपशहर प्रमुख संतोष पवार, सचिन उर्फ भैया कदम, महिला उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, महिला शहर संघटिका वैशाली भोसले, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, संजय गोताड, बापू चिपळूणकर, मनोज पांचाळ, उपविभाग प्रमुख फैय्याज शिरळकर, अमोल टाकळे, शिवसैनिक गणेश खेतले, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे हे ठाकरे गटाकडून उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) : शहराध्यक्ष रतन पवार, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोथवडेकर, महिला शहराध्यक्ष डॉ. रेहमत जबले, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, राष्ट्रीय सचिव एम. बंदूकवाले, अर्बन बँक संचालक सतीशअप्पा खेडेकर, कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश ताम्हणकर, सोशल मीडिया अध्यक्ष आसिफ मुकादम, कादिर मुकादम, छाया खातू, हसीना राजीवटे, अनिता पवार, राधिका तटकरे यांची उपस्थिती आहे.

काँग्रेस पक्ष : जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव, युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, ओबीसी जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण, उपाध्यक्ष संजय जाधव, महिला शहराध्यक्षा विना जावकर, माजी नगरसेविका सफा गोठे, सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार,सेवा दल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, सल्लागार दादा आखाडे, रफिक मोडक, यशवंत फके, कैसर देसाई सुरेश राऊत लियाकत शेख आदी उपस्थित होते.या आंदोलनामुळे चिपळूणमध्ये महाविकास आघाडीचा संघर्षमय व लोकशाही रक्षणासाठीचा निर्धार अधोरेखित झाला.

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

Web Title: Mahavikas aghadis strong protest against the public safety act in chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Chiplun
  • Mahavikas aaghadi
  • Nationalist Congress Party
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Chiplun: महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई; ज्वलंत प्रश्नावर राजकारण!
1

Chiplun: महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई; ज्वलंत प्रश्नावर राजकारण!

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे
2

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’
3

Dharashiv Politics: धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकीय रणकंदन! भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची बॅनरबाजी, शहराच्या विकासाला ‘ब्रेक’

शिक्षणाच्या मंदिरात राडा! ‘या’ शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्…; चिपळूणमधील धक्कादायक घटना
4

शिक्षणाच्या मंदिरात राडा! ‘या’ शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्…; चिपळूणमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.