Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूणची जीवनवाहिनी वाशिष्ठी प्रदूषित; केंद्रीय अहवालाने उडाली खळबळ

चिपळूण शहरासह परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या असलेली ही नदी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष अहवालातून समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. यावर पाहू या नवराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 07:17 PM
Ratnagiri News : चिपळूणची जीवनवाहिनी वाशिष्ठी प्रदूषित; केंद्रीय अहवालाने उडाली खळबळ
Follow Us
Follow Us:
  • चिपळूणची जीवनवाहिनी वाशिष्ठी प्रदूषित
  • केंद्रीय अहवालाने उडाली खळबळ
रत्नागिरी/ निसार शेख : नॅशनल वॉटर क्वालिटी प्रोग्रॅम अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांमध्ये चिपळूणची जीवनवाहिनी मानली जाणारी वाशिष्ठी नदी समाविष्ट झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरासह परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या असलेली ही नदी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष अहवालातून समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. यावर पाहू या नवराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट.

विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जाते. फिजिओ-केमिकल घटक, धातू, कीटकनाशके तसेच पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण यासारख्या मापदंडांच्या आधारे नद्यांच्या पाण्याचा दर्जा निश्चित केला जातो. विशेषतः बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) या निकषांच्या आधारे नदीतील प्रदूषणाचा स्तर ठरवला जातो.

निकषांनुसार पाण्यातील बीओडीचे प्रमाण ३ मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असल्यास पाणी स्वच्छ, 3 ते 10 मिलीग्रॅम दरम्यान असल्यास मध्यम प्रदूषित, तर 10 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास अतिप्रदूषित मानले जाते. तसेच चे प्रमाण 10 ते 20 मिलीग्रॅम प्रति लिटर दरम्यान असल्यास पाणी स्वच्छ समजले जाते; त्यापेक्षा जास्त असल्यास ते प्रदूषित असल्याचे मानले जाते.२०२५ च्या अहवालानुसार देशभरातील 623 प्रमुख व मोठ्या नद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 271 नद्यांमध्ये 216 प्रदूषित पट्टे आढळून आले असून त्या यादीत वाशिष्ठी नदीचाही समावेश आहे. मात्र याबाबत चिपळूण नगरपालिका यांना कोणत्याही प्रकाराचे पत्र आले नाही तसा अहवाल सुद्धा आला नसल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

Maharashtra Politics: विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…

औद्योगिक सांडपाण्याचा परिणाम
वाशिष्ठी नदीच्या प्रदूषणामागे लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी शुद्ध करण्यासाठी लोटे येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत असला तरी काही कारखानदारांकडून नियमांचे उल्लंघन करून थेट नदीत सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी टँकरद्वारे रात्रीच्या वेळी चोरीने सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचेही सांगितले जाते त्यावर बंधन आले पाहिजे अशी मागणी चिपळूण जलदूत शहानवाज शहा यांनी केली आहे.

उमेश सकपाळ,नगराध्यक्ष चिपळूण

राज्यातील सर्वच नद्या प्रदूषित आहेत मात्र चिपळूण वाशिष्ठी नदी प्रदुषित असल्याचा तसा अहवाल चिपळूण नगरपालिका यांना अद्याप आला नाही मात्र चिपळूण मधील शिवनदीचे सांडपाणी हा विषय खूप गंभीर आहे त्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करण्यासाठी 70 ते 80 कोटी लागतील तेवढा निधी नगरपालिका कडे नाही पण तसा प्रस्ताव पाठवण्याचे काम लवकरच करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.

या सर्व प्रकरणाचा आवाज काँग्रेसचे गटनेते नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी उठविला आहे याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अधिकारी यांना जाब विचारला याबाबत त्याने नवराष्ट्र चैनल ला काय प्रतिक्रिया दिली ते देखील जाणून घेऊयात.

जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मागणी दरम्यान, या अहवालावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव यांनी वाशिष्ठी नदी प्रदूषणाच्या यादीत येणे धक्कादायक असल्याचे सांगितले. चिपळूण नगरपालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या तरी निधीअभावी काम होत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अशा प्रकारे हात झटकून चालणार नाही. वाशिष्ठी नदीवर त्वरित सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे अत्यावश्यक असून अन्यथा भविष्यात नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार ,भास्कर जाधव

या सांडपाण्यातील घातक रसायने जलशुद्धीकरण प्रक्रियेत पूर्णपणे नष्ट होत नसल्याने भविष्यात मानवी आरोग्य तसेच नदीतील जलजीवांसाठी धोका – निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र चिपळूण नगरपालिका स्वच्छ पाणी चिपळूण वासियांना देत आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन नगरद्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

आला रे आला! रत्नागिरी जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याच्या हालचाली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Ratnagiri news chipluns lifeline vashishthi river polluted central report creates stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Chiplun Nagar parishad
  • navrashtra news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
3

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
4

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.