लांजा तालुक्यातील माचाळ गावच्या विकासातील ऐतिहासिक क्षणांची नोंद आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नामुळे झाली आहे.. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळ गावात एसटी सेवेचा अखेर शुभारंभ झाला आहे.. देश स्वातंत्र्यानंतर प्रथमच 78 वर्षांनी माचाळ गावात एसटी बस सेवा सुरू झाली आहे. लालपरी माचाळ येथे दाखल होताच ग्रामस्थानी फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात एसटी बसचं स्वागत केलं. यावेळी महिलांनी लालपरीचं औक्षण केलं. यावेळी एसटी विभागाचे अधिकारी, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर,पंचायत समिती सदस्य उमेश पत्की, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.