Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक; नगराध्यक्षांवरील आराेपांचा केला निषेध

चिपळूण नगरपरिषदेतील दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असून, चिपळूण शहरचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात धडक देत जोरदार भूमिका मांडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 04, 2026 | 04:38 PM
दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक; नगराध्यक्षांवरील आराेपांचा केला निषेध

दिव्यांग खोका प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक; नगराध्यक्षांवरील आराेपांचा केला निषेध

Follow Us
Follow Us:

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेतील दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यावर करण्यात आलेल्या कथित आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना चिपळूण शहरचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात धडक देत जोरदार भूमिका मांडली. शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. निवेदनानुसार, मूळ लाभार्थी दीपक रामचंद्र म्हाडे यांच्या नावावरील खोका अन्य व्यक्तीच्या नावावर वर्ग करण्यात आला. जयश्री जयसिंग सावंत यांना नियमबाह्य पद्धतीने लाभ देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

यावेळी शिवसैनिकांनी मालमत्ता विभागाचे अधिकारी सागर शेडगे यांच्यावर गंभीर आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. २०१८ पासून प्राप्त झालेल्या सर्व दिव्यांग अर्जांची तपासणी, पात्र लाभार्थ्यांची पडताळणी व शासन नियमांचे पालन झाले का याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले, ही खोका वाटप प्रक्रिया प्रशासनाच्या कार्यकाळात झाली होती. मालमत्ता अधिकारी सागर शेडगे यांनी नगराध्यक्षांना ‘जयश्री जयसिंग सावंत यांना खोका मी माझ्या अधिकाराखाली दिला आहे,’ असे सांगितले होते. मात्र, असे विधान करणे ही त्यांची चूक असल्याची कबुली मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी रश्मी गोखले, गटनेते अंकुश आवले, बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणी सभापती निहार कोवळे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, महिला व बालकल्याण उपसभापती पल्लवी महाडिक, नगरसेविका निलम जाधव, नगरसेवक उदय जुवळे, नगरसेवक प्रमोद बुरटे, नगरसेवक विकी लवेकर, महिला आघाडी शहर प्रमुख प्राजक्ता टकले, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, परिमल भोसले, सुरेश राठोड, युवा सेना शहर प्रमुख विनोद पिल्ले, राकेश देवळेकर, फैसल मेमन, विनोद कदम, प्रतीक्षा हरवंडे, विद्याधर महाडिक, विनायक रेडीज, भाऊ भाटकर, सिद्धेश चव्हाण, सुधीर पानकर, विशाल नारळकर, सुधाकर सकपाळ, शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कारवाई न केल्यास जनआंदोलन

दरम्यान, दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही प्रकार शिवसेना सहन करणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना चिपळूण शहरच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना चिपळूण शहरच्या वतीने देण्यात आला.

हक्कांवर घाला घालणारा प्रकार

मुख्याधिकारी संजय जाधव यांना निवेदन देताना शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्याला तातडीने समोर बोलावून घेण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी दालनात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांचा अवमान आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांवर घाला घालणारा प्रकार शिवसेना सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा : महायुतीत अंतर्गत धुसफूस उघड! सत्तारांनंतर संजय गायकवाड, नरेंद्र बोंडेकरांचा भाजपवर थेट निशाणा

पदाचा गैरवापर झाल्याचा संशय

दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि पदाचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Shiv sainiks stormed the office of chief officer sanjay jadhav in chiplun and made a strong statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Chiplun
  • Chiplun Nagar parishad
  • shivsena

संबंधित बातम्या

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
1

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
2

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

RATNAGIRI : तिवरे गावावर दरडीचे भीषण संकट; १५० घरांवर धोक्याची टांगती तलवार
3

RATNAGIRI : तिवरे गावावर दरडीचे भीषण संकट; १५० घरांवर धोक्याची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.