Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात सोशल मीडियावर पोस्ट वॉर सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांसह पक्षातील नेत्यांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 06:19 PM
mahayuti clash

mahayuti clash

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीत अंतर्गत संघर्ष
  • नवनाथ बन विरुद्ध रवींद्र धंगेकर, सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध
  • एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना दिला सबुरीचा सल्ला
 

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील सोशल मीडिया वॉर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली असून धंगेकरांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

नवनाथ बन विरुद्ध रवींद्र धंगेकर सोशल मीडियावर जुंपली

गेल्या काही दिवसांपासून नवनाथ बन आणि रवींद्र धंगेकर यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू आहे. याआधी शिवसेना नेते निलेश राणे यांनीही नवनाथ बन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

धंगेकर यांनी कार्टून स्टाइलमधील एक फोटो पोस्ट केला. या चित्राच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालय आणि कमळाचं चिन्ह दाखवण्यात आलं असून, एक व्यक्ती कुत्र्याला पाव खाऊ घालत असल्याचं चित्र आहे. या पोस्टसोबत धंगेकरांनी नवनाथ बन यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली.

हि याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला….!! अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला. #बनश्वान #चिल्ला_पुकार #Paid_Animal https://t.co/vsGpMDHOv5 — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 31, 2026

नवनाथ बन यांचाही पलटवार

दुसरीकडे नवनाथ बन यांनीही सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिलं. त्यांनी रवींद्र धंगेकर यांचा चेहरा असलेला रंग बदलणाऱ्या सरड्याचा फोटो पोस्ट केला. या चित्रात धंगेकरांच्या अंगावर त्यांनी यापूर्वी काम केलेल्या काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेची चिन्हं दाखवण्यात आली आहेत. दोन्ही नेत्यांच्या या पोस्टमुळे भाजप आणि शिंदेसेनेतील वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे.

काय म्हणतात पुणेकर
रंग बदलू धंगेकर! https://t.co/l0N3fBqcog
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 31, 2026

एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला

या सगळ्या प्रकारात आता एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नका, असा सल्ला त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर नेत्यांना दिल्याचं समजतं. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्याऐवजी दुष्काळी भागातील नागरिकांना मदत करण्याच्या कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यातील सोशल मीडिया वॉर थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला

💡

Frequently Asked Questions

  • Que: भाजप आणि शिंदेसेनेमध्ये वाद कोणत्या मुद्द्यावरून सुरू झाला?

    Ans: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

  • Que: रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यात नेमका काय वाद आहे?

    Ans: दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करणारी व्यंगचित्रात्मक छायाचित्रे पोस्ट केली. त्यातून हा वाद अधिक चर्चेत आला.

  • Que: एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना काय सल्ला दिला?

    Ans: महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत आणि राजकीय टीका-टिप्पणीऐवजी दुष्काळी भागातील मदतकार्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Web Title: Maharashtra politics eknath shinde advises ravindra dhangekar bjp shiv sena vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Ravindra Dhangekar
  • shivsena

संबंधित बातम्या

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान
1

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

BJP PM Candidate: 2029 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? मोदी, योगी की…; अमित शाहा यांनी स्पष्टच सांगितलं
2

BJP PM Candidate: 2029 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? मोदी, योगी की…; अमित शाहा यांनी स्पष्टच सांगितलं

Harshvardhan Sapkal : वाढवण बंदरावरून महाराष्ट्रात संघर्ष पेटणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला स्पष्ट इशारा
3

Harshvardhan Sapkal : वाढवण बंदरावरून महाराष्ट्रात संघर्ष पेटणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला स्पष्ट इशारा

Pune Graduate MLC Election Analysis मविआचे मायक्रो प्लॅनिंग; पुणे पदवीधरमध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
4

Pune Graduate MLC Election Analysis मविआचे मायक्रो प्लॅनिंग; पुणे पदवीधरमध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.