Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित 'वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला' सलग दोन वर्षात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा महोत्सव होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 24, 2025 | 07:45 PM
Ratnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव
  • डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन
चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ सलग दोन वर्षात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता तिसऱ्या वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दि. 5 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन 2026 कृषी महोत्सव बहाद्दरशेखनाका येथील चिपळूण नगर परिषदेचे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या कृषी महोत्सवामुळे ‘कोकण कृषीची पंढरी’ होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास यानिमित्ताने प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे.

कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र, याला छेद देत परिपूर्ण आणि अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला . वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि. हा प्रकल्प यशस्वीपणे दिमाखदार वाटचाल करीत आहे.

कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया, बहाद्दरशेख नाका येथील बँकेच्या अर्थ साहाय्याने वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 7 सप्टेंबर 2021रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत अत्याधुनिक वाशिष्ठी दुग्धप्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी 2023रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन झाले. लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला.

कोकणात या अगोदर काही लोकांनी दुग्ध प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु, विविध कारणांमुळे हे प्रकल्प अल्पावधीतच बंद पडले. कोकणात दुग्ध प्रकल्प यशस्वी होत नाही, अशी मानसिकता झाली. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करणारे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, असे स्वप्न सुभाषराव चव्हाण यांनी पाहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत.

सलग दोन वर्ष वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. पहिल्याच वर्षी तीन दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद आणि कृषीप्रेमींच्या मागणीनुसार गतवर्षी तब्बल ५ दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनाचा कोकणातील हा पहिलाच प्रयोग सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे सलग दोन वर्षे यशस्वी होत आहे. लाखो कृषी प्रेमी आणि नागरिक या प्रदर्शनाला भेट देतात. यंदाही हे प्रदर्शन पाच दिवस सुरू राहणार आहे. सलग तिसऱ्या वर्षीही या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच स्टॉल नोंदणीसाठी 9422661197, 9637605757, 7588330011, 9890393823, 7722045048 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सवात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. चर्चासत्रासाठी विशेष कक्ष तर पशुपक्षी व प्राणी प्रदर्शन, फ्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन देखील होणार आहे. पिलरलेस दोन शामियान, परदेशी भाजीपाला, विविध मनोरंजनांच्या कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे.

Maharashtra Politics: कोकणातील चौदा पालिकांवर ‘महिला राज’; ‘या’ जागांवर मिळवला विजय

चिपळूण शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान येथे 5 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनाच्या सभा मंडपासह इतर कामाचा शुभारंभ वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते म्हणाले की, वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन हे केवळ स्टॉल्सचे प्रदर्शन नाही, तर हे शेतीविषयक विचारांचे सक्षम व्यासपीठ, प्रगतीची शिदोरी, अनुभवांची देवाणघेवाण आणि कोकणातील संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सशक्त पूल असल्याचे वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन 2026 कधी आणि कुठे आयोजित करण्यात आले आहे?

    Ans: हे प्रदर्शन दि. 5 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान चिपळूण शहरातील बहाद्दरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.

  • Que: या कृषी महोत्सवाचे आयोजन कोणी केले आहे?

    Ans: या कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन वाशिष्ठी डेअरी प्रकल्प (मे. वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Que: ) या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: कोकणातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाचे मार्गदर्शन करणे, दुग्ध व्यवसायाबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण करणे, आधुनिक शेती व पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: Vashishthi dairy agriculture and livestock exhibition festival organizing an agricultural exhibition through dairy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात
1

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी
2

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन
3

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल
4

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.