कोकणातील चौदा पालिकांवर 'महिला राज' (फोटो- सोशल मीडिया)
राजकारणात महिलांचा प्रभाव वाढला
कोकणात 11 ठिकाणी महिला राज
कोकणात निकालाचे दिसले वेगळे चित्र
गुहागर: कोकणातील स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलत असून महिलांचा राजकारणातील प्रभाव वाढताना दिसत आहे. रविवारी नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. कोकणात या निकालांनी वेगळे चित्र समोर आणले असून नगर परिषदांमध्ये महिलाराज (Elections) आले आहे. आरक्षणामुळे रत्नागिरी आणि रायगडात प्रत्येकी ६, तर सिंधुदुर्गात २ महिलांना नगराध्यक्षपदी संधी मिळाली. रत्नागिरी, खेड, राजापूर, अलिबाग, रोहा, पेण, कर्जत, मुरुड, उरण, सावंतवाडी, मालवण या ११ नगर परिषदा आणि गुहागर, देवरुख, लांजा या तीन नगर पंचायतीवर नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. एकूणच या निकालांमधून स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण, पक्षांची ताकद आणि मतदारांचा मूड स्पष्ट होत आहे.
सर्व ठिकाणी चुरशीच्य लढती; महिलांना संधी
येत्या काळातील राजकीय हालचालीवर या निकालांचा मीठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हह्यातील रत्नागिरी, राजापूर व खेड या तीन महत्त्वाच्या नगर परिषदा तसेच देवरुख, लांगा, गुहागर नगरपंचायतीतील नगराध्यक्ष पदांच्या जागा आरक्षित झाल्या, त्यामुळे येथे नगराध्यक्षपदी महिलाना संधी मिळाली आणि जिल्ह्याची राजकीय समिकरणे बदलली. या सर्व ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी चुरशीच्या लढती झाल्या.
नगराध्यक्षपदाच्या लढती झाल्या रंगतदार व चुरशीच्या
आरक्षणामुळे सर्वच राजकीय पक्षांना त्यांची जुनी समीकरणे बाजूला ठेवून महिला उमेदवारांना संधी द्यावी लागली, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे विजयी झाल्या आहेत. तर खेड नगरपरिषदेत शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्षपदावर बाजी मारली. राजापूर नगरपरिषदेत कॉंग्रेसच्या हुस्नबानू, खलिपे यांनी विजय मिळयत नगराध्यक्षपद पटकावले असून, त्या माजी आमदारही आहेत. देवरुख नगरपंचायतीत भाजपच्या मृणाल शेटे आणि गुहागर नगरपंचायतीत भाजपाच्या निता मालपांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. रायगडचा विचार केला तर महिला आरक्षित झालेल्या अलिबाग, रोहा, पेण, कर्जत, मुरुड, उरण या सहा नगर परिषदांवर महिलाराज आले आहे. येथील नगराध्यक्ष पदाच्या लढती देखील रंगतदार आणि चुरशीच्या झाल्या, अलिबाग नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या अक्षया नाईक यांनी विजय मिळविला.
सार्वत्रिक निवडणुकीत गळ्यात विजयाची माळ
पेणमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रितम पाटील, कर्जतच्या नगररूयक्षपदी अजित पवार राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे, मुरुडच्या नगराध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर तर उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी श.प. राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर विजयी झाल्या, सिंधुदुर्गात देखिल सावंतवाडी आणि मालवण या दोन नगर परिषदांची सत्ता महिलांच्या हाती आली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत-भोसले विजयी झाल्या. तर मालवाग नगरपरिषदेवर शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर यांनी विजय मिळविला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






