Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम

तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायती या अभियानात सक्रियपणे सहभागी झाल्या असून, सर्वच ग्रामपंचायतींमध्ये वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यापैकी तीन ते चार ग्रामपंचायतींनी शंभर टक्के वसुली पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 12:12 PM
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वसुलीला वेग; ओझर्डेत थकीत नळ कनेक्शन तोडणीची धडक मोहीम

Follow Us
Follow Us:

वाई : वाई तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत सशक्तीकरण विभागाच्या वतीने वसुली मोहिमेला वेग देण्यात आला असून, तालुक्यातील ग्रामपंचायतींनी थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वसुलीसाठी स्वतंत्र गुणांकन पद्धती लागू करण्यात आली असून, एकूण सहा गुण वसुलीवर आधारित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जास्तीत जास्त वसुली करण्यावर भर दिला जात आहे.

तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायती या अभियानात सक्रियपणे सहभागी झाल्या असून, सर्वच ग्रामपंचायतींमध्ये वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यापैकी तीन ते चार ग्रामपंचायतींनी शंभर टक्के वसुली पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. ओझर्डे ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गावामध्ये मागील सहा ते सात वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टी व इतर करांच्या वसुलीसाठी थेट नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रशासनाने हा कडक निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त वसुली पूर्ण व्हावी आणि तालुका तसेच जिल्हा स्तरावर अभियान यशस्वी व्हावे, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, विस्तार अधिकारी शरद गायकवाड, राहुल हजारे, रूपेश मोरे, ग्रामपंचायत अधिकारी रत्नाकर गायकवाड, प्रशांत धुमाळ, किरण पिसाळ, अतुल डेरे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, वसुलीला मोठ्या प्रमाणात गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : PM Awas Yojana : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतलंय? मग आता केली जाणार कडक चौकशी

Web Title: Recovery accelerates in cm samrudd panchayat raj mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
3

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
4

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.