Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीत ‘वंचित’ राहिल्याची खंत; प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने पत्राद्वारे केली टीका, म्हणाले, “जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा……”

VBA on Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडी आणि वंचितच्या जागांचा तिढा संपण्याचे नाव घेत नाही. आता तर 'वंचित'ने पत्राद्वारेच आपली खंत व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या आणि उर्वरित वंचितच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 08, 2024 | 06:36 PM
महाविकास आघाडीत ‘वंचित’ राहिल्याची खंत; प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने पत्राद्वारे केली टीका, म्हणाले, “जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा……”
Follow Us
Close
Follow Us:

VBA on Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडी आणि ‘वंचित’मधील जागांचा तिढा संपण्याचे नाव घेत नाही. आता वंचितने आपली खंत पत्राद्वारे व्यक्त करीत समस्या मांडली आहे. जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या आणि उर्वरित वंचितच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आहे, असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्राद्वारे मांडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवाय वंचितला किती जागा द्यायचा, यावरुनही महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

रेखा ठाकूर म्हणाल्या, महाविकास आघाडीत जागावाटपावरून आमचा अवमान होत आहे. जागावाटपात वंचित बहुजन आघाडीला अवघ्या 2 जागा दिल्याचा रेखा ठाकुर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली आहे तर कांग्रेस मधील नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आमची ताकद लक्षात घ्यावी, असंही रेखा ठाकूर यांनी नमूद केलं आहे.

महाविकास आघाडीच्या दिरंगाई आणि अनिर्णायक दृष्टीकोनाबाबत चिंतेत

रेखा ठाकूर म्हणाल्या, भाजप आणि आरएसएसच्या विनाशकारी आणि नीच अजेंड्याविरोधात सातत्याने ठामपणे उभा असलेला माझा पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या दिरंगाई आणि अनिर्णयाक दृष्टीकोणाबाबत चिंतेत आहोत. 2 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी वगळता इतर बैठकांमधून वंचित बहुजन आघाडीला वगळण्यात आले. महाविकास आघाडीची संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरी आम्ही सकारात्मक आहोत, असंही ठाकूर यांनी पत्रातून स्पष्ट केलय.

आम्हाला केवळ 2 जागा देण्यात आल्यात

रेखा ठाकूर पुढे या पत्रात म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलीत, आदिवासी, गरिब मराठा आणि मुस्लिमांमध्ये विस्तारत असताना आम्हाला केवळ 2 जागा देण्यात आल्या आहेत. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. यावेळी असे जाणवले की, या जिल्ह्यांत आमचे काम कमी असले तरी, महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे. त्यांना या मतदार संघामध्ये जनाधार नाही, त्यामुळे या जागा आमच्यासाठी त्रासदायक आहेत, असं मत वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रातून मांडले आहे.

वंचित बहुजन आघाडीला सन्माजनक आणि जिंकणाऱ्या जागा द्याव्यात. महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा आम्हाला नको आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष विभाजीत झालेले आहेत. शिवाय, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने सक्षण राजकीय शक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे, असंही ठाकूर यांनी पत्राद्वारे नमूद केलं आहे.

Web Title: Regrets being disadvantaged in mahavikas aghadi prakash ambedkars party criticized in a letter nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 06:36 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
1

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी
2

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान
3

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

Uddhav Thackeray News:  ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.