जत :खलाटी पंपहाऊस ब अंतर्गत येणार्या गावांना नियोजनबध्द रित्या पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे, जत तालुका अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह तालुक्यातील शेड्याळ, वळसंग, पाच्छापूर, सोरडी, रावळगुंडवाडी, खोजनवाडी, येळवी या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जत तालुक्याचे तारणहार म्हैसाळचे अभियंता इंजी.सचिन पवार, इंजी.खरमाटे यांची भेट घेत निवेदने दिली.
खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्याच्या शिष्टमंडळासाठी दोन तासाचा वेळ देत सर्व अधिकाऱ्याना वंचित राहीलेल्या गावांना पाणी देण्याच्या सूचना दिल्या. येळवी वाढीव पाईपलाईन करण्याचेही तोंडी आदेश दिले व शेड्याळपासून बिळूरपर्यंत पाणी सोडण्याचेही नियोजन केले.
यावेळी शेड्याळचे सरपंच भगवानदास केंगार, अशोककाका जाधव, विद्याधर जाधव, रखमाजी केंगार, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, सरपंच मोहनराव गायकवाड, वळसंगचे सरपंच रमेश माळी व सहकारी, खोजानवाडीचे गुरू बसर्गी व सहकारी, रावळगुंडवाडीचे प्रभुआण्णा मोकाशी, पाच्छापूरचे सरपंच विनोद जाधव, येळवीचे समाधान जगताप, भाऊसाहेब कदम, लोहगावचे दिपक पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी दयानिधी, खासदार संजय पाटील, इंजी.सचिन पवार यांनी शेड्याळपासून वंचित राहीलेल्या सर्व गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले व शेतकर्यांच्या इतर समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.
Web Title: Release water to underprivileged villages in a planned manner and immediately sunil pawar nrab