Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन “भारताचं इटली” म्हणून ओळखलं जातं. रंगीबेरंगी इमारती, तलाव, हिरवीगार डोंगररांग आणि युरोपियन शैलीमुळे इथे गेल्यावर परदेशात असल्यासारखं वाटतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2026 | 08:23 AM
महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच... इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच... इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्हीही महाराष्ट्रात फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण शोधत असाल तर लवासा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
  • यातील नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी अनेक पर्यटकांना याकडे आकर्षित करतं.
  • कुटुंबासोबत फिरण्यासाठी हा एक परफेक्ट स्पॉट आहे.
भारतामध्ये अशा अनेक पर्यटनस्थळांचा समावेश आहे, जिथे गेल्यावर परदेशात आल्यासारखं वाटतं. महाराष्ट्रातील असंच एक सुंदर आणि वेगळं हिल स्टेशन म्हणजे लवासा. रंगीबेरंगी इमारती, डोंगररांगांमध्ये वसलेलं शहर, तलावाच्या काठावर असलेली कॅफे संस्कृती आणि नीटस रस्ते यामुळे लवासा पाहताच लोक त्याला प्रेमानं “भारताचं इटली” म्हणतात. इथे पोहोचल्यावर काही क्षणांसाठी तरी आपण भारतात आहोत, याचा विसर पडतो.

बर्फाच्छादित पर्वत आणि गरम नदी: भारतातील अनोखे ठिकाण जिथे पाणी गरम करावे लागत नाही, त्वचेचे रोगही होतात दूर

लवासा हे पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक नियोजनबद्ध हिल सिटी आहे. चारही बाजूंनी हिरवीगार डोंगरदऱ्या, शांत तलाव आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेलं हे शहर मनाला लगेच भुरळ घालतं. लवासाची खरी ओळख म्हणजे त्याची वास्तुरचना. इटालियन धाटणीच्या इमारती, मोकळे चौक, वॉटरफ्रंट प्रोमेनेड आणि आकर्षक कॅफे यामुळे हे ठिकाण खूपच खास वाटतं. सकाळी तलावाच्या काठी फेरफटका मारणं आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहणं हा इथला अत्यंत शांत आणि समाधान देणारा अनुभव मानला जातो.

लवासा फक्त पाहण्यासाठीच नाही, तर अनुभवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. इथे बोटिंग, कयाकिंग, सायकलिंग आणि ट्रेकिंगसारख्या अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज करता येतात. साहसी अनुभव आवडणाऱ्यांसाठी झिप लाईनिंग आणि रॉक क्लायंबिंगसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. याशिवाय, इथल्या कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेणं किंवा इटालियन खाद्यपदार्थ चाखणं हा अनुभव वेगळाच असतो. त्यामुळे कपल्स, कुटुंबीय आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी लवासा एक परिपूर्ण ठिकाण ठरतं.

लवासा भेटीसाठी योग्य काळाबद्दल सांगायचं झालं, तर पावसाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू इथे फिरण्यासाठी उत्तम मानले जातात. पावसाळ्यात हिरवळ अधिकच खुलून येते आणि तलावाचं सौंदर्य दुप्पट वाढतं. मात्र, या काळात रस्त्यांवर घसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेणं गरजेचं असतं. हिवाळ्यात हवामान थंड आणि आल्हाददायक असल्यामुळे फिरणं अधिक सोयीचं होतं.

Republic Day 2026: फक्त 20 रुपयांत मिळेल प्रजासत्ताक दिन 2026 च्या परेडाचे तिकीट, जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

खर्चाच्या बाबतीत लवासा फारसा महागडा नाही. पुणे किंवा मुंबईहून रस्तेमार्गे सहज पोहोचता येतं. पुण्यापासून लवासा सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. पेट्रोल आणि टोलचा खर्च धरून ये-जा मिळून अंदाजे 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. राहण्यासाठी इथे विविध बजेटनुसार हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. साध्या हॉटेलमध्ये एका रात्रीचा खर्च साधारण 2,500 ते 4,000 रुपये इतका असतो, तर आलिशान रिसॉर्ट्समध्ये हा खर्च 6,000 रुपयांपेक्षा अधिकही जाऊ शकतो. एकूणच, निसर्गसौंदर्य, शांत वातावरण आणि युरोपियन शैलीचा अनुभव एकाच ठिकाणी हवा असेल, तर लवासा हे ठिकाण नक्कीच तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असायला हवं.

Web Title: Maharashtras lavasa is known for italy of india know how to go travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Italy
  • maharashtra
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
1

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Republic Day 2026: फक्त 20 रुपयांत मिळेल प्रजासत्ताक दिन 2026 च्या परेडाचे तिकीट, जाणून घ्या बुकिंग प्रोसेस
2

Republic Day 2026: फक्त 20 रुपयांत मिळेल प्रजासत्ताक दिन 2026 च्या परेडाचे तिकीट, जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
3

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
4

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.