
Return of rains in Jalgaon leads to a reign of filth and outbreak of epidemic diseases
Jalgaon News: जळगाव : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक गेले आहे, मात्र परतीच्या पावसाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सतत बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. आजारी लोकांचे प्रमाण वाढले असून यामुळे रोगराई देखील पसरत आहे.
परतीच्या पावसाने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचारोग, डेंग्यू, मलेरिया, टायफाइड सारख्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांची गर्दी वाढली आहे. शेतकरी वर्ग पिकांच्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच घराघरांत आजारपणाचे सावट पसरल्याने चिंता वाढली आहे. परतीच्या पावसामुळे साचलेले पाण्यामुळे ओलसर वातावरण निर्माण झाले आहे. जागोजागी डबकी साचल्यामुळे डासांची वाढ होत असून यामुळे आजार फैलावण्याची प्रमुख कारणे ठरत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागरिकांनी घराभोवती साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, डासांपासून बचावासाठी प्रतिबंधक उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान विभागाने अजून काही दिवस वातावरणात आर्द्रतेचा अंश कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोगराईत शहरात मुख्य रस्त्यांवर झाली कचराकोंडी
बदललेल्या वातावरणामुळे साथींच्या आजारांचा फैलाव होत असताना जळगाव सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी मात्र कचराकोंडी झालेली आहे. यामुळे जळगावकरांचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. कचराकुंड्या ओसंडून रस्त्यावर कचरा फैलला आहे. त्यातच मोकाट गुरे, श्वान, वराह ही घाण अधिक फैलवताना दिसत आहेत. शहरातील काही ठिकाणी गटारीचे ढापे फुटले असल्यामुळे तेथेही घाणीचे साम्राज पसरलेले दिसून येत आहे. शहरातील नवीन बसस्थानक ते स्वातंत्र चौक परिसरात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्या आठ ते दहा दिसांपासून कचऱ्याचे झाडून जमा केलेले ढीग जैसे थे पडून आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापन कोलमडलेले दिसून येत आहे. आयुक्त आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.
सोरायसीस आजारावर जनजागृती
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात नागरिक सोरायसीस दिनानिमित्त व्याख्यानात त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले. १९ ऑक्टोबर हा जागतिक सोरायसीस दिन हणून पाळला जातो. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचा विकार विभागातर्फे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमात डॉ. पंकज तळेले यांनी सोरायसीस या आजाराची लक्षणे, निदान व त्यावरील उपचारासंबंधी तपशीलवार माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शरीराच्या कोणत्याही भागावर लालसर, जाड, खक्लेयुक्त, वेदनादायक असे डाग निर्माण होतात. हा आजार संसर्गजन्य नाही आणि चुकीच्या स्वच्छतेमुळे होत नाही. त्वचेवर गोलाकार, जाड, लाल किंवा गुलाबी, खवलेयुक्त डाग निर्माण होतात. खाज, जळजळ, वेदना, किंवा पुरळ निर्माण होणे, नखांमध्ये बदल,