Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

महसूल विभाग गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होतोय.या माध्यमातून राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 20, 2025 | 08:21 PM
राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

राज्य सरकारकडून महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यांत लोकहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, या माध्यमातून राज्याचा महसूल विभाग देशातील सर्वोत्तम विभाग ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आवाहन केले की आपत्तीग्रस्तांच्या घरातही आनंदाचा दिवा पेटावा यासाठी सामाजिक संवेदनशीलतेतून कार्य करावे.

महसूल विभागाच्या कामगिरीचे कौतुक

मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालय तसेच क्षेत्रीय स्तरावरील महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. मागील काही महिन्यांत सेवा पंधरवडा, वाळू धोरण, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, तुकडेबंदी, जिवंत सातबारा, स्थानिक विषय यांसारख्या विविध क्षेत्रांत महसूल यंत्रणेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वॉर रूमची करण्यात आली स्थापना! हेतू ” विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधने अन् निधीचा अपव्यय टाळणे”

या प्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. तर जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

वाळू लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

सर्वसामान्य नागरिकांना वाळू सहज उपलब्ध व्हावी, यासाठी वाळू धोरणाचे काटेकोर पालन करून नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व वाळू गटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या निधीचे योग्य व पारदर्शक वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले.

नियम आणि कायद्यांमध्ये सुधारणा सुचविण्याचे आवाहन

मंत्री बावनकुळे यांनी पुढील वर्षात नागरिकांच्या हितासाठी महसूल विभागातील आवश्यक नियम व कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, विभागातील अनेक पदोन्नत्या आधीच झाल्या असून, उर्वरित पदोन्नत्यांची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल.

Mumbai News : मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार, वांद्रे येथे १४० एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प

अपर मुख्य सचिवांचे निर्देश

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या वाळूच्या गरजा लक्षात घेऊन वाळू गटांची निविदा, कार्यादेश आणि लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महसूल विभागाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासनाचे आदेश आणि नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी आदेश दिले.

Web Title: Revenue minister chandrashekhar bawankule believes that the states revenue department will be the best in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • chandrashekar bawankule

संबंधित बातम्या

‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स
1

‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स

नवीन फीचर्ससह अपडेट झाली Suzuki ची ‘ही’ कार, आता प्रवाशाची सेफ्टी अजूनच वाढली
2

नवीन फीचर्ससह अपडेट झाली Suzuki ची ‘ही’ कार, आता प्रवाशाची सेफ्टी अजूनच वाढली

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?
3

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?

TVS Jupiter 110 vs Jupiter 125: दोन्ही स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?
4

TVS Jupiter 110 vs Jupiter 125: दोन्ही स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.