Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandarshekhar Bawankule: “राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी…”; रेडी रेकनरबाबत काय म्हणाले महसूल मंत्री?

मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र 'व्हॅल्यू झोन' ठरवले जातात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2025 | 09:33 PM
Chandarshekhar Bawankule: "राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी..."; रेडी रेकनरबाबत काय म्हणाले महसूल मंत्री?

Chandarshekhar Bawankule: "राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी..."; रेडी रेकनरबाबत काय म्हणाले महसूल मंत्री?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.  रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले, तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. 2023-24 आणि 2024-25 मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये 10-15 टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.  मात्र त्या निराधार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, ॲड.अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी दरवाढ करण्याचा शासनाचा कोणताही हेतू नसून राज्यात दर ठरवताना स्थानिक परिस्थिती, विकास दर आणि मागणी-पुरवठा यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे, ज्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दर निश्चित करतात. यामध्ये गरजेनुसार काही दर कमी करण्याचा विचारही केला जातो, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र ‘व्हॅल्यू झोन’ ठरवले जातात. रेडी रेकनर दर ठरविताना गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात राज्य सरकार जनतेच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेत असून, 9 जानेवारी 2025 रोजी या संदर्भात बैठक झाली आहे. तसेच, 1 एप्रिलपूर्वी जर कोणालाही काही सूचना द्यायच्या असतील, तर त्या सरकारकडे मांडाव्यात, असे आवाहन सुद्धा मंत्री श्री.बावनकुळे यांनी केले. शासन कोणत्याही भागात अवाजवी दरवाढ करणार नाही, तसेच गरज असल्यास काही दर कमी करण्याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बावनकुळेंचं ‘हे’ विधान चर्चेत

महायुती बळकट आहे. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात. आम्ही दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप गठीत करत आहोत. एकनाथ शिंदे, आणि अजित पवारही त्यांच्या पातळीवर पक्षवाढ करत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा कब्जा असेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बावनकुळेंचं ‘हे’ विधान चर्चेत; म्हणाले, ”महायुती…”

कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. एकनाथ शिंदेंनी पुण्यात भगवा फडकवण्याचा दावा केला असून, अजित पवार यांनी आम्हीच तिरंगा फडकवणार असल्याचे म्हटल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. बावनकुळे म्हणाले, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या- ज्या ठिकाणी लढतील, तिथे युतीतील इतर पक्ष मदत करतील. त्यामुळे महायुतीमध्ये कोणतेही वितृष्ट नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

Web Title: Revenue minister chandrashekhar bawankule said about ready reckoner rate budget session 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • Budget Session
  • Chandrasekhar Bawankule
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
2

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
3

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
4

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.