Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारकडून वर्षभराची मुदतवाढ

मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 11:11 AM
मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

Follow Us
Follow Us:
  • मराठी शिकण्यासाठी चालकांना आणखी एक वर्षाची मुदत
  • सरकारच्या निर्णयाची उच्च न्यायालयाने घेतली नोंद
  • चार रिक्षा-टॅक्सी चालकांची याचिका निकाली
मराठी भाषा शिकण्यासाठीची मुदत एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती शनिवारी उच्च्च न्यायालयाला राज्य सरकारकडून देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मराठी भाषा शिकण्याच्या अनिवार्य नियमाला स्थगिती मिळवण्यासाठी चार रिक्षा टॅक्सी चालकांनी केलेली याचिका निकाली काढली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली मुदत एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाला दिली. त्याची नोंद घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली. रिक्षा- टॅक्सी आणि कॅब चालकांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतल्यानंतर तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुदतवाढीची घोषणा केली होती.

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता

यामुळे मराठी न येणाऱ्या चालकांवरील तात्काळ कारवाई थांबली आणि त्यांना भाषा शिकण्यासाठी अधिक वेळ मिळाला होता. दरम्यान, वकील विवेक शुक्ला यांच्यामार्फत चार रिक्षा टॅक्सी चालकांनी जनहित याचिका दाखल करून, १२ ऑगस्टला काढलेल्या सरकारी अधिसूचनेला आव्हान दिले होते. तसेच ही अधिसूचना नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा केला होता.

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय ?

याचिकाकेनुसार, हा नियम संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार), १९ (व्यापार आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य) आणि २१ (जगण्याचा अधिकार) अन्वये असलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचेठ उल्लंघन करणारा आहे. तसेच, हा नियम ‘मोटार वाहन कायद्या’च्या तरतुदीशी विसंगत आहे. या कायद्यात वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी कोणत्याही भाषेची अट नमूद केलेली नाही. मोटार वाहन कायदा राज्य सरकारला चालकासाठी एखाद्या भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे ही पात्रता, बिल्ला मिळवण्याची अट किंवा परवान्याची अट म्हणून निश्चित करण्याचा अधिकार देत नाही. त्याचप्रमाणे, अशा कारणास्तव बिल्ला निलंबित करण्याचा किवा रद्द करण्याचा अधिकारही देत असल्याचा दावाही याचिकेत केला होता.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Rickshaw taxi drivers marathi learning deadline extended one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Auto Driver
  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Marathi Language

संबंधित बातम्या

Marathi Language: ‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल
1

Marathi Language: ‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
2

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
3

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
4

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.