Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर केवळ बोर्ड लावून काम पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 01:18 PM
वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा

वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा

Follow Us
Follow Us:

वाई : वाई तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणारा आणि सामाजिक नातेसंबंध दृढ करणारा म्हणून ओळखला जाणारा ‘धरणाखालचा रस्ता’ सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. हा रस्ता पूर्णत्वास न नेता अर्धवट सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर केवळ बोर्ड लावून काम पूर्ण झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची दिशाभूल झाल्याचा आरोप होत आहे. हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी नसून, धरणाच्या दोन्ही बाजूंवरील लोकांना त्यांच्या नातेवाईकांशी, माहेरवाशीणींशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, या मार्गाने प्रवास करताना नागरिकांना घसरून पडण्याची भीती सतत वाटत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या मनात शासनाविषयी अविश्वास निर्माण होत आहे.

Wai News : वाई शहरात दारुड्यांची हुल्लडबाजी ! यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरला बनवले दारुचा अड्डा

स्थानिकांच्या मते, ठेकेदार आपल्या मनमानीने काम करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ कागदोपत्री काम उरकत असल्याचे चित्र दिसत आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ठेकेदारांना मोकळीक मिळत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

…तर नागरिक जनआंदोलन छेडतील

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा दोन्ही भागातील नागरिक रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाची तक्रार संबंधित मंत्र्यांपर्यंत व आमदार मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्धारही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

अनेक दिवसांपासून धरणाखालचा रस्ता बनवण्याचे काम सुरु

अनेक दिवसांपासून धरणाखालचा रस्ता बनवण्याचे काम चालू आहे. मात्र, या रस्त्यात केवळ मुरूम टाकण्यात आला असून, त्यावर एक थर खडीचाच फक्त टाकला आहे. बाकी सर्व मुरुमच आहे तोही मुरूम धरणाच्या हद्दीतील डोंगर माथ्यातून उकरून आणलेला आहे याची रॉयल्टी भरली का नाही ही सुद्धा महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना माहिती नसेल या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Road below the dam in wai taluka remains incomplete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Wai News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.