Wai News : वाई शहरात दारुड्यांची हुल्लडबाजी! यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरला बनवले दारुचा अड्डा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
विशेष म्हणजे, हे मद्यपी केवळ दारू पिऊन निघून जात नाहीत, तर रिकाम्या बाटल्या आणि कचरा तसाच दुकानांसमोर टाकून जातात. दुसऱ्या दिवशी दुकानदारांना आपल्या दुकानासमोर घाण आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकारामुळे ग्राहकांमध्येही नकारात्मक प्रतिमा तयार होत असून व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. “ही परिस्थिती कायम राहिली तर शॉपिंग सेंटरची ओळखच बदनाम होईल,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दुकानदारांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवून संबंधित मद्यपींवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाई (Wai) शहरांमध्ये अपुरा पोलीस फौजफाटा असल्याने वाई शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी वाढली आहे मोठ्या आवाजाचे सायलेसर बसून मोठ मोठाले गाड्यांच्या सायलेन्सर मधून आवाज करणे ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चालवतात शालेय मुलं यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी वाई शहराला मोठा पोलीस फौज फाटा पाठवावा अशी मागणी वाईकर नागरिकांच्याकडून होत आहे.
यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी “विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन “आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरिता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे” हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. परंतु मद्यपींमुळे याचे नाव खराब होत आहे.






