Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पावसाळ्यापूर्वीच केली जाणार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे; अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

दुरुस्तीची कामे करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. दुरुस्तीच्या कामांची बिले पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2025 | 11:36 AM
Pune News : पावसाळ्यापूर्वीच केली जाणार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे; अतिरिक्त आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश

Pune News : पावसाळ्यापूर्वीच केली जाणार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे; अतिरिक्त आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : यंदा तरी पावसाळ्यात पुणेकरांची रस्त्यांवरील खड्डयातून सुटका होणार का? असा प्रश्न अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पडला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश पथ विभागाला दिले आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनि:सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदिश खानोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडून दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून, रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. या सर्व खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जास्त मनुष्यबळ वापरून हे काम 7 जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिवटे यांनी दिले आहेत.

दरम्यान, दुरुस्तीची कामे करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. दुरुस्तीच्या कामांची बिले पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये. आपत्ती निवारण संदर्भातील करावयाची खोदाई आणि कामाच्या संदर्भात पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवण्यात येऊन काम करावे, अशा सूचना दिवटे यांनी दिल्या आहेत.

काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात

मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुण्याला अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. यामुळे काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. सध्या पावसाने उघडीप दिली असून, रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप वेगाने होत नसल्याचे दिसत आहेत. महापालिकेच्या विविध विभागाने केलेल्या खोदाईच्या ठिकाणी अद्याप रस्ते दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही.

Web Title: Road repair work to be done before the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • pune news
  • Road Work

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.