Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्कलकोटमधील रस्ते गुदमरले! अरुंद रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी

  • By Aparna
Updated On: Jan 25, 2024 | 08:30 PM
अक्कलकोटमधील रस्ते गुदमरले! अरुंद रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

अक्कलकोट : अक्कलकोट तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह तीर्थक्षे त्रापैकी एक अशी सर्वाधिक गर्दीचे तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती होत आहे. मात्र अक्कलकोट तीर्थक्षेत्रातील मंदिरे गत्ली बोळातच आहेत. मंदिरा जवळ येऊन नव्या भाविकानां मंदिर कुठे आहे, अशी विचारणा करावी लागते. अरुंद अतिक्रमणयुक्त रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी भाविकातून व्यक्त होत आहे.

सर्व भागातून चारपदरी सहा पदरी जलद गती रस्त्यातून भाविक अक्कलकोटी दाखल होतात. अक्कलकोट तीर्थक्षेत्री मात्र प्रमुख मंदिरे गल्ली बोळात अरुंद रस्त्यामधूनच भाविकांना मार्गक्रमण करावे लागते. यातच मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे, भर रस्त्यावर उभी राहणारी भाविकांची वाहने, रिक्षा यामुळे या परिसरात जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. वाहतुकीस अडथळा असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मोहिम नगरपािलका राबवित आहे. यामुळे शहरतील रस्ते मोकळे श्वास घेताना दिसतात. मात्र यामध्ये सातत्य राखण्याचे काम नगरपालिका यंत्रणेला जमेल काय ? याबद्दल शंका व्यक्त होत आहे.

मुख्याधिकारी सचिन पाटील, तहसिलदार बाळासाहेब शिरसट, पोलीस निरिक्षक जितेद्र कोळी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिम राबविली आहे. मात्र कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा मास्टर प्लॅन राबविणे गरजेचे आहे

भूसंपादन करावे लागणार
नगरपालिकेने सन १९७२ मध्ये मास्टर प्लॅन तयार केला असले तरी शासनाने सुचविलेल्या सूचनेवरून वेळोवेळी त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. सुधारित प्लॅन २०१२ मध्ये जाहीर करण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिण महाद्वार ते मुरलीधर मंदिर, फत्तेसिह चौक, तूप चौक ,कापड बाजार मेन रोड, कारंजा चौक, मार्गे समाधी मठ ते ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर पर्यंत असा मार्ग आहे. हा मार्ग १२ मीटर रुंदीचा, ८५० मीटर लांबीचा असणार आहे. सध्या २५ ते २८ फुटाचा रस्ता अस्तित्वात असून दोन्ही बाजूने मिळून १० फुट भूसंपादन करावे लागणार आहे. यासाठी किमान २०० प्रॉपटी बाधित होणार आहेत.

असा आहे दुसरा पाखली मार्ग
मंदिराच्या उत्तर महाद्वार ते गुरू मंदिर, राम गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, दावल बँड ते कारंजा चौक मार्गे समाधी मठ असा दुसरा पालखी मार्ग असणार आहे. ९ मीटर रुंदीचा, ६०० मीटर लांबीचा असून सध्या २२ फुटाचा रस्ता अस्तित्वात आहे. दोन्ही बाजूने मिळून ८ फुटाचा भूसंपादन करावा लागणार आहे. १२५ ते १५० प्रॉपर्टी बाधित होणार आहे.

Web Title: Roads traffic in akkalkot demand for immediate widening of narrow road nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2024 | 08:30 PM

Topics:  

  • Akkalkot
  • maharashtra
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.