जळगाव: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे स्वीय सहायक राहिलेले पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. दरम्यान पांडुरंग नाफडे हे रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. दरम्यान रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेत नाफडे यांचे आरोप खोडून काढले आहेत.
रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने त्यांच्या पतीसह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेत रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याला धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्याला आता रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या, “सीमा नाफडे यांनी कोणतेही पुरावे न देता, कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याला बदनाम करण्यासाठी आपल्या नावाचा वापर केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे माझी समाजात आपली बदनामी झाल्याने मी त्यांच्या विरोधात बदनामी खटला दाखल करणार आहे. या सगळ्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अडचणीत असलेल्या महिलेची मदत करण्याऐवजी अशा महिलांचा राजकारण करण्यासाठी वापर करीत असल्याने, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाच्यासाठी लायकदार नसून त्यांच्या राजीनाम्याची मी मागणी करत आहे.”
“सीमा नाफडे यांनी आरोप केलेल्या त्यांच्या पती पांडुरंग नाफडे यांच्या सोबत गेल्या दोन वर्षांपासून आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्षाच्या गुणवंत नील या कार्यकर्त्या सोबत रुपाली चाकणकर यांनी गोपनीय भेट घेत आपल्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आले आहे.” रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर आणि गुणवंत नील या कार्यकर्त्याच्या भेटीचे छायाचित्र ही माध्यमांना दाखविले आहे,” असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.