
Chhatrapati Sambhajinagar Smart City
Maharashtra Politics: निकालासाठी 15 दिवसांची प्रतीक्षा; एका मताला 15 ते 20 हजारांचा भाव अन्…
स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक अलीकडेच झाली. यामध्ये अध्यक्षा विनीता सिंघल, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, संचालक भास्कर मुंडे, उल्हास गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड आणि वित्तीय अधिकारी उत्तम चव्हाण उपस्थित होते. महापालिकेने शहर विकास आराखड्यात नमूद मंजूर रस्त्यांवरील बेकायदा बांधकामे दूर केली. आता या पाडापाडीमुळे मोकळी झालेली जागा वापरून वाहतूक नियोजन सक्षम करण्यासाठीचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच केंद्र किंवा विविध वित्तपुरवठा संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कामांमध्ये जालना रोड, पडेगाव-दौलताबाद टी-पॉइंट, जळगाव रोड, बीड बायपास आणि पैठण रोड या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड, बस-बे, सिग्नल सुधारणा, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
शहरातील रस्त्यांवर अनियमित पद्धतीने वाहन उभी करण्याच्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्मार्ट पार्किंग धोरण लागू करत आहे. त्यासाठी खास स्मार्ट पार्किंग अॅप विकसित करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि निरीक्षण सुलभ करण्यासाठी क्लीन स्ट्रीट अॅप देखील तयार होणार असून, दोन्ही प्रस्तावांना बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला.