Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार! ‘घाटी’ला आता ‘एम्स’चा दर्जा मिळणार? राज्य सरकारचा केंद्राकडे मोठा पाठपुरावा

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाला एम्स (AIIMS) चा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत काय बदल होतील, जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 03:34 PM
मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार! (Photo Credit- X)

मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार!
  • ‘घाटी’ला आता ‘एम्स’चा दर्जा मिळणार?
  • राज्य सरकारचा केंद्राकडे मोठा पाठपुरावा
अंकुश थोरात । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील लाखो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले छत्रपती संभाजीनगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी आता एका नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. घाटीला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले असून राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे संकेत मिळत आहेत. ही मागणी प्रत्यक्षात उत्तरली तर मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये १९५० मध्ये स्थापन झालेली घाटी संस्था गेल्या अनेक दशकांपासून मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून काम करत आहे. सुरुवातीला मर्यादित सुविधांसह सुरू झालेल्या या रुग्णालयाने काळानुसार मोठी झेप घेतली आहे. आज येथे एमबीबीएसच्या २०० जागा, पदव्युत्तर अभ्यासक्रम, सुपरस्पेशालिटी विभाग आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

‘घाटी’ मराठवाड्याचे प्रमुख उपचार केंद्र

दररोज सुमारे तीन हजार बाह्यरुग्ण उपचारासाठी घाटीत दाखल होतात, तर हजारो रुग्णांवर आंतररुग्ण म्हणून उपचार केले जातात. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, बुलडाणा आणि अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांतील रुग्णांसाठी घाटी हेच प्रमुख उपचारकेंद्र बनले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची संख्या मोठी असल्याने परवडणाऱ्या उपचारांसाठी या रुग्णालयावर मोठा भार असतो. घाटीला एम्सचा दर्जा मिळावा, या मागणीला आता राजकीय पातळीवरही बळ मिळत आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही घाटीच्या सुविधा वाढविण्यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारकडून नवीन एम्स संस्थांसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याने मराठवाड्यासाठी ही संधी मानली जाते.

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा

घाटी है केवळ शहरापुरते मर्यादित नाही मराठवाड्यातील लाखो रुग्णांसाठी हे अंतिम आधारस्थान आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्‌या शक्य नसते. घाटी स्वस्त आणि विश्वासार्ह उपचार देणारे केंद्र म्हणून ओळखले जाते. आधुनिक उपकरणांची, तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.

एम्सचा दर्जा मिळाल्यास काय बदलू शकते?

घाटीला एम्सचा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयाचा विस्तार, नवीन इमारती, अत्याधुनिक उपकरणे आणि अधिक खाटांची सुविधा निर्माण होऊ शकते. देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधक येथे कार्यरत होण्याची संधी वाढेल. हृदयविकार, कर्करोग, मेंदूविकार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवरील उच्चस्तरीय उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.

विद्यार्थ्यांनाही मोठ्या संशोधनाची संधी

एम्सचा दर्जा मिळाल्यास घाटी केवळ उपचार केंद्र राहणार नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे केंद्र बनू शकते. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षणाची संधी मिळेल. यामुळे मराठवाड्यातील विद्याव्यांना देशातील सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची संधी आपल्या भागातच उपलब्ध होऊ शकते. परिणामी घाटीची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडीत ८१% पाणीसाठा; उन्हाळ्याची चिंता मिटली?

Web Title: There will be a revolution in the health system of marathwada ghati will now get the status of aiims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Government Hospital
  • Marathwada

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.