Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: कचऱ्याच्या ‘बायोमायनिंग’मध्ये ६७ कोटींची ‘मलई’ साफ? पुन्हा ५८ कोटींच्या नव्या निविदेचा ‘डाव’ उघड

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पात ६७ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. जुने काम अपूर्ण असतानाच नव्या ५८ कोटींच्या निधीसाठी प्रशासनाचा खटाटोप.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 02:58 PM
Chhatrapati Sambhajinagar: कचऱ्याच्या ‘बायोमायनिंग’मध्ये ६७ कोटींची ‘मलई’ साफ? पुन्हा ५८ कोटींच्या नव्या निविदेचा ‘डाव’ उघड
Follow Us
Follow Us:

 

  • कचऱ्याच्या ‘बायोमायनिंग’मध्ये ६७ कोटींची ‘मलई’ साफ?
  • पुन्हा ५८ कोटींच्या नव्या निविदेचा ‘डाव’ उघड
छत्रपती संभाजीनगर: कचरा अन् त्याच्या दुर्गंधीने अनेक जण नाक मुरडत लांबून जाणे पसंत करतात. माञ याच कचऱ्यातून ‘मलई’ काढून खाण्याचा ‘प्रताप’ महापालिका प्रशासनाने केल्याचे उघड झाले आहे. मांजरीला वाटते आपल्याला दूध पितांना कोणी पाहत नाही? असे समजून ती यथेच्छ ताव मारते. तसाच ताव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६७ कोटीं खर्च केल्याचे दाखवत दुधासकट ‘मलाई’ ही साफ करण्याचे काम केले आहे. प्रत्यक्षात कचरा तसाच राहून बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. कचऱ्यावर ६७ कोटी खर्च केल्यानंतर नव्याने ५८ कोटी रुपयांचा बायोमागनिंग प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नव्याने शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला असून पुन्हा एकदा ‘मलई’ खाण्याचा ‘डाव’ मांडला असल्याचे समोर आले आहे.

नारेगाव कचरा डेपोतील साठलेल्या कचर्यावर बायोमायनिंग प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिकेने प्रकल्प सल्लागार संस्था (पीएमसी) नियुक्त केली होती. त्यासोबतच मनपातील वरिष्ठ व तज्ज्ञ अभियंत्यांनीही डेपोमधील कचऱ्यांचे मोजमाप करून अहवाल सादर केला होता. या सर्वेक्षणानुसार नारेगाव येथे सुमारे १२ लाख मेट्रिक टन कचरा असल्याचा अंदाज नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला करण्यात आलेल्या कचर्याच्या सर्वेक्षणात तफावत असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात जबाबदारी निश्चित न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कचरा हाताळणीबाबत काही त्रुटी समोर आल्या होत्या. निविदेतील अटींचे उल्लंघन झाल्याने कंत्राटदाराला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर बायोमायनिंग प्रक्रिया सुरू झाली. कंत्राटदाराने सुमारे आठ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केल्याचा दावा केला असला तरी त्याबाबतची अधिकृत माहिती महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. पावसाळ्याच्या काळात प्रक्रिया थांबविण्यात आल्याचेही सांगितले जाते.

दरम्यान, नारेगाव डेपोमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक कचरा साचलेला असल्याचे पुढे लक्षात आले. तसेच चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातही साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने ५८ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सुरुवातीचे सर्वेक्षण चुकीचे ठरल्याचं दिसून येत असताना त्याबाबत कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; प्लॉटच्या नावाखाली सहा जणांनी लावला चुना

महापालिकेचे जीएनआय कंपनीला काम

या अंदाजाच्या आधारे बायोमायनिंगसाठी सुमारे ६९ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने काही घटक कमी करून ६७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. निधी उपलब्ध झाल्यानंतर महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून जीएनआय कंपनीला काम दिले.

बायोमायनिंग कचऱ्याचा तपशील अजून अस्पष्ट

नारेगाव, चिकलठाणा आणि पडेगाव येथे नेमक्या किती मेट्रिक टन कबर्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यात आली याबाबतची अधिकृत माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराच्या दाव्यानुसार मोठ्या प्रमाणात कचरा प्रक्रिया झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याची आकडेवारी किवा अहवाल उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रक्रिया प्रकल्प असूनही साचण्याचे कारण काय?

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलताणा, पड़ेगाव आणि हसूल येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्यास दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र या प्रकल्पांमध्ये किती प्रक्रिया होते याची माहिती जाहीर केली जात नसल्याने दिसत आहे.

इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका; एलपीजी तुटवड्यामुळे उत्पादनावर संकट

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal corporation garbage scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • scam

संबंधित बातम्या

MJPJAY Fraud News: आरोग्य योजनेत तब्बल १६ हजार संशयास्पद शस्त्रक्रिया! मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय; चौकशीसाठी SIT गठीत
1

MJPJAY Fraud News: आरोग्य योजनेत तब्बल १६ हजार संशयास्पद शस्त्रक्रिया! मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय; चौकशीसाठी SIT गठीत

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
2

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
3

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
4

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.