Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; प्लॉटच्या नावाखाली सहा जणांनी लावला चुना

प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली, त्यानंतर नोंदणीकृत खरेदीखत न करता टाळाटाळ, बाऊन्स झालेले धनादेश, जीपीए व बनावट करारनाम्यांच्या आधारे फसवणूक करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 02:48 PM
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक (Photo Credit- X)

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक
  • प्लॉटच्या नावाखाली सहा जणांनी लावला चुना
छत्रपती संभाजीनगर: प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला सहा जणांनी तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून मोठी रक्कम उकळली, त्यानंतर नोंदणीकृत खरेदीखत न करता टाळाटाळ, बाऊन्स झालेले धनादेश, जीपीए व बनावट करारनाम्यांच्या आधारे फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान दिल्ली गेट परिसरातील सलमान हॉल येथे घडला.

सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शेख इरफान शेख शफीक, शेख सलमान शेख शफीक, गौसिया बेगम शेख शफीक, शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. सलमान हॉल, दिल्ली गेट), शेख जमील शेख गुलाम रसुल (३४, रा. ईदगाह झोपडपट्टी, रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात एकतानगर परिसरात राहणारे गोरख मानसिंग चव्हाण (६०) यांनी फिर्याद दिली. ते पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले.

असा झाला फसवणुकीचा व्यवहार

सध्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. २०२३ मध्ये त्यांची ओळख यासीन खान याच्यामार्फत शेख इरफान याच्याशी झाली. इरफान हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, असे सांगून त्याने हिमायतबाग परिसरातील चाऊस कॉलनी येथील गट क्रमांक १९/१ मधील १८.७ आर जमीनविक्रीस असल्याचे सांगितले. जमीन शेख जमील यांच्या नावावर असल्याचे सांगून इरफान व त्याच्या कुटुंबीयांनी चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी सातारा परिसरातील रो-हाऊस विक्रीचा तात्पुरता करार केला. मात्र त्या व्यवहारातील सहमालकाने इरफानने कोणतीही रक्कम दिलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने फसवणूक उघडकीस आली. प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार देण्यात आली. तपासानंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

एक कोटी ३३ लाखांची देयक

हा व्यवहार २ कोटी रुपयांत ठरला, त्यानुसार चव्हाण यांनी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तर त्यांचे मित्र यासीन खान यांनी विविध तारखांना रोख रक्कम दिली. १५ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान एकूण १ कोटी ३३ लाख रुपये इरफान याला देण्यात आले. ही रक्कम मिळाल्याची नोंद त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात रजिस्टरवर लिहून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बंदूकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

रक्कम परत देणे शक्य नसल्याचे सांगत आरोपीने हिमायतनगर परिसरातील प्लॉट क्रमांक ८३ ते ८६ देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्ष खरेदीखत न करता केवळ नोंदणीकृत मुखत्यारनामा (जीपीए) करून दिला. त्या प्लॉटचा ताबा देण्यात आला नाही. त्यानंतर दिल्ली गेट येथील सलमान हॉलमधील दोन दुकाने विक्री करण्याचा करार झाला. दुकानाचा ताबा घेण्यासाठी चव्हाण व त्यांचे भागीदार गेले असता शेख शफीक उर्फ शेख साहब याने बंदूक दाखवत पुन्हा येथे आलात तर गोळी मारेन, अशी धमकी दिली.

खरेदीखत टाळले; धनादेशही वाटले नाहीत

मोठी रक्कम घेतल्यानंतर इरफानने जमीन नोंदणीकृत करून देण्यास टाळाटाळ केली. पैसे परत मागितल्यावर त्याने जुलै २०२४ मध्ये समजुतीचा करार करून ४० लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. मात्र हे धनादेश बैंकेत न चटता परत आले. त्यानंतर दिलेले इतर घनादेशही खाते बंद असल्याने वाटले नाहीत.

Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

Web Title: Retired police sub inspector cheated of rs 133 crore six people plotted the plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
2

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
3

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.