तक्रारदार महिलेसह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याचे उद्धट वर्तन
Kalyan News Marathi: कल्याणमधील पत्री पूल परिसरात राहणाऱ्या एका गरोदर महिलेच्या घराच्या दिशेने झुकलेले झाड हटविण्यात यावे. त्या झाडावरुन वीज वाहिनी जात असल्याने वीज पुरवठा खंडीत केल्यावर झाड तोडता येईल अशी मागणी वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे केली. मात्र वीज पुरवठा खंडीत न करता महिलेकडून २५ हजार रुपयांची मागणी करुन तिच्यासोबत उद्धट वर्तन केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
या प्रकरणी जाब विचारणाऱ्या पत्रकारासोबत ही अधिकारीऱ्याने उद्धट भाषा केली. पत्रकारांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. त्यावर अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यास समज देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
पत्रीपूल परिसरात रुकसाना अन्सारी या राहत असून त्यांच्या घराशेजारी झाड आहे. हे झाड पावसाळ्यात त्यांच्या घराच्या छपराच्या दिशेने कलले. ते झाड त्यांच्या घरावर पडून जिवीत हानी होऊ शकते. मात्र त्या झाडावरुन एक वीजेची वाहिनी आहे. या वीज वाहिनीचा विद्युत प्रवाह बंद केला तर झाड तोडता येईल यासाठी अन्सारी यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रार करुन आठवडा उलटून गेला तरी वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज पुरवठा खंडीत करीत नाहीत.
तिच्याकडे वीज पुरवठा खंडीत करण्याच्या बदल्यात अधिकारी प्रशांत राऊत याने २५ हजार रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप अन्सारी हिने केला आहे. राऊत याने तीन वेळा वीज पुरवठा खंडीत केला होता. तिने झाड तोडून घेतले नाही. तर अन्सारीच्या मते वीज पुरवठा खंडीतच केला नाही. त्यामळे झाड तोडता आले नाही.
या प्रकरणात तिने अधिकाऱ्यांना जाब विचारला. तेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्याशी उद्धट वर्तन केले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने अधिकाऱ्याला या जाब विचारला असता. त्याच्यासोबतही अधिकाऱ्याने उद्धट वर्तन केले. या प्रकरणी अधिकाऱ्याच्या विरोधात पत्रकारांनी वीज वितरण कंपनीचे मुख्यालय गाठले. अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांची भेट घेऊन राऊत यांच्या उद्धट वर्तनाविरोधात तक्रार केली. राऊत यांना समज देण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता थोरात यांनी दिले आहे.